पाचोरा येथील गो.से.हायस्कूल मध्ये श्री. संतसेवालाल महाराज जयंती साजरी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०२/२०२२
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथे सत्य, सेवाभाव व त्याग अशी मानवतावादी शिकवण देणारे भक्ती व परमार्थाच्या मार्गाने समाजात जागृती करणारे बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेले थोर संत श्री. सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
श्री. संत सेवालाल महाराज यांच्या २८३ व्या जयंती निमित्त प्रतिमेचे पुजन करुन माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिलाताई वाघ पर्यवेक्षक आर एल पाटील एन आर पाटील, ए बीआहिरे, कार्यालय प्रमुख अजय सिनकर, टेक्निकल वि.प्रमुख एस एन पाटील किमान कौ.वि.प्रमुख मनीष बाविस्कर तसेच ज्येष्ठ शिक्षक महेश कौण्डिन्य, प्रदीप पाटील, एम एन देसले,देवरे सर, अनिल पाटील, पी एस पाटील, उज्वल पाटील व इतर शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.