सौ.गीतांजली कोळी यांच्या प्रयत्नातून, मोठी वाघाडी येथे लग्नसमारंभात दारुबंदीचा निर्णय,
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०५/२०२२
शिंदखेडा तालुक्यातील सोनगीर जवळील मोठी वाघाडी या गावात महाराष्ट्र दारूबंदी महिला युवा मोर्चाच्या अध्यक्षा सौ. गीतांजली कोळी यांनी दिनांक २ मे २०२२ सोमवार रोजी दारूबंदी जनजागृती निमित्ताने कार्यक्रम घेतला. यावेळी घेण्यात आलेल्या बैठकीत सर्वानुमते हळदी व लग्नसमारंभात संपूर्ण दारुबंदी करण्यासाठीचा निर्णय घेण्यात आला.
आपण सद्यस्थितीत खोट्या प्रतिष्ठेसाठी लग्नत भपका दाखवण्यासाठी वाद्य म्हणून डी.जे. लावण्यासाठी लग्न ठरवतांनाच बोलीबंधन करुन घेत असल्याचे सर्वदूर दिसून येत आहे. वाद्य लावणे चुकीचे नाही परंतु डी.जे. मुळे मानवी शरीरावर तसेच मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होऊन दुष्परिणाम होत आहेत. तसेच डी.जे.आला म्हणजे सगळ्यांनाच आनंद लुटायचा असतो तो म्हणजे नाचगण्यातुन लग्नसमारंभात नाचणं विईट नाही. परंतु नाचतांना व आनंद घेतांना दारु पिणे व पाजणे या वाईट पध्दतीने कहर केला आहे. दारु पिल्या शिवाय किंवा पाजल्याशिवाय आम्ही नाचणार नाही अशी अट घातली जाते किंवा ज्याच्याघरी लग्नसमारंभ आहे ते कुटुंब आपला रुबाब दाखवण्यासाठी अगोदर दारु आणून ठेवतात.
याच खोट्या प्रतिष्ठेच्या ओघात लग्नसमारंभात वाडवडीलांच्या समोर अल्पवयीन मुले व सर्व लहान थोर मंडळी कळत, नकळत दारुच्या आहारी जाऊन बरबाद होत आहेत. तसेच दारु पिल्यानंतर लग्नसमारंभात व इतर कार्यक्रमात भांडणतंटे होऊन हा वाद विकोपाला जाऊन लग्न मोडल्याच्या घटना घडत आहेत. याचेच जिवंत उदाहरण मराठवाड्यातील एका लग्नसमारंभात अनुभवायला आले आहे.
हे सगळे दुष्परिणाम लक्षात घेऊन महाराष्ट्र दारूबंदी महिला युवा मोर्चाच्या अध्यक्षा सौ. गीतांजली ताई कोळी यांनी नवीन उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाअंतर्गत सौ. गीतांजली ताई कोळी यांनी दिनांक २ मे २०२२ सोमवार रोजी शिंदखेडा तालुक्यातील सोनगीर जवळील मोठी वाघाडी या गावात जाऊन या मोहिमेची मुहुर्तमेढ रचली व या गावातील एका लग्नसमारंभात जाऊन त्यांनी तेथील वधुवर पक्षाच्या व लग्नाला आलेल्या वऱ्हाडी मंडळींना एकत्र बसवून ग्रामस्थांच्या उपस्थितीत एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी दारुमुळे होणारे दुष्परिणाम तरुण पिढीच्या अधोगतीला कारणीभूत ठरणारी आहे हे उदाहरणासह पटवून देत लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमात दारुबंदी करण्यासाठी बोधपर मार्गदर्शन करुन दारुबंदी करण्यासाठी आवाहन करत सगळ्यांची मते जिंकून घेतली.
सौ. गीतांजली ताईंच्या यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत दोघेही लग्न घरच्या मंडळींना हा मुद्दा पटल्यावर त्यांनी लग्नसमारंभात दारु अजिबात आणली जाणार नाही. असे आश्वासन दिले तसेच याठिकाणी जमलेल्या मंडळींनी विशेष करुन गावातील आदिवासी टोकरे कोळी जमातीच्या महिलांनी संपूर्ण दारुबंदी करण्यासाठी व व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी पाठिंबा देत हळदीच्या किंवा लग्नसमारंभात जिथे, जिथे दारु आढळून येईल तेथे, तेथे महिलांनी एकत्रितपणे जाऊन तेथील दारुचा नायनाट करुन दारु पिणाऱ्या ना कार्यक्रम उधळून लावण्यासाठी एकमुखी ठराव करुन तो कायमस्वरूपी आमलात आणण्यासाठी एकमुखाने जाहीर केले.
सौ गीतांजली ताई कोळी या महाराष्ट्र दारूबंदी महिला युवा मोर्चाच्या अध्यक्षा अध्यक्षा असून त्या मागील पाच वर्षांपासून गावोगावी जाऊन जनप्रबोधन करुन जनजागृती करत दारुबंदी करण्यासाठी महिलांना सोबत घेऊन घराघरांतून व गावागावातून दारुबंदी करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. याच कार्यक्रमात त्यांनी अक्षयतृतीयेच्या पुर्वसंध्येला मोठी वाघाडी या गावात या गावात जाऊन तरुणांमध्ये व गावातील सर्व गावकऱ्यांमध्ये दारुबंदी करण्यासाठी चर्चा व गावातून दारु ही कायमस्वरूपी हद्दपार होण्यासाठी ग्रामस्थांचे मनपरिवर्तन करुन ग्रामस्थांनी दिलेल्या आश्वासनामुळे त्या मोठ्या समाधानाने ग्रामस्थांचे आभार मानत परत फिरल्या.
यावेळी मोठी वाघाडी गावातील सर्व ग्रामस्थ, महिलावर्ग, माता, भगिनी, तसेच गोपाल कोळी, विकी कोळी, लहु कोळी, वाल्या सेना गृपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.