छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावापुढचे धर्मवीर नाव काढण्याबाबत मराठा सेवा संघ व इतर पुरोगामी संघटना वतीने पाचोरा नगरपालिका मुख्याधिकारी प्रशासक यांना निवेदन‌.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/१०/२०२२

पाचोरा शहरात भडगाव रोड परिसरात छत्रपती संभाजी महाराज स्मारक आहे. त्या स्मारकावर नाव लिहितांना धर्मवीर असे विश्लेषण लावून धर्मवीर संभाजी महाराज असे लिहिण्यात आलेले आहे. परंतु
भारतीय इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांचा अभ्यास केला असता असे दिसून येते की महाराजांनी फक्त एका विशिष्ट धर्मासाठी कार्य केले नसून सर्व जाती धर्म व अठरा पगडजतींसाठी त्यांनी न्यायाची भूमिका घेऊन आपले कार्य केलेले आहे.

असे असल्यावर ही पाचोरा नगरपालिकेने त्यांचा उल्लेख करतांना धर्मवीर असे विश्लेषण करुन त्यांच्या नावपुढे धर्मवीर असे लावल्याने त्यांना एक धर्मापुरते मर्यादित ठेवून त्यांची भूमिका ही इतर धर्मीयांप्रती ही दुष्मनीची होती की काय का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कारण छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक छात्रविर, एक जागतिक राजकीय तत्ववेत्ता, विविध भाषेचे जाणते अभ्यासक, लेखक, तत्त्वनिष्ठ, धर्मनिरपेक्ष राजा म्हणून त्यांचा उल्लेख इतिहासात केलेला आहे तरीही आपणाकडून त्यांच्या नावापुढे धर्मवीर लावण्यात आले असून ही चुक त्वरित दुरुस्त करुन धर्मवीर हा शब्द वगळून त्याजागी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज असा बदल करण्यात यावा यासाठी मराठा सेवा संघातर्फे पाचोरा नगरपालिकेच्या कार्यकारी अधिकारी सौ. शोभा जी बाविस्कर यांना देण्यात आले आहे.

सदर निवेदन देतांना मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष मा. श्री. सुनील पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष, विद्यार्थी आघाडीचे शिवश्री मा. श्री. मुकेश तुपे, संभाजी ब्रिगेडचे मा. श्री. गणेश पाटील, मा. श्री. एस. ए. पाटील, मा. श्री. जिभाऊ पाटील, मा. श्री. विजय जाधव, मा. श्री. रवींद्र पाटील, मा. श्री. अनिल मराठे, मा. श्री. किशोर पाटील, मा. श्री. हरीभाऊ पाटील, मा. श्री. योगेश पाटील, मा. श्री. रणजीत पाटील, मा. श्री.अनिल आबा येवले, मा. श्री. किशोर डोंगरे, मा. श्री. शशिकांत मोरे, रईस बागवान, मा. श्री. भिवा आबा, मा. श्री. सचिन पाटील, मा. श्री. बापू भोई, मा. श्री. रवी ठाकूर, मा. श्री. धीरज कुमार कुशावाहा इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

ब्रेकिंग बातम्या