सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भोजे येथील सावता सॉमिल व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश उभाळे यांची तक्रार.

  • लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • शेतकऱ्यावर कोसळले अस्मानी संकट, सार्वे पिंप्री शिवारात विज पडून तीन गायी ठार.

  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›लोहारा येथे घरात शिरून राका कुटुंबीयांना मारहाण. पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल.

लोहारा येथे घरात शिरून राका कुटुंबीयांना मारहाण. पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल.

By Satyajeet News
May 14, 2021
2513
0
Share:
Post Views: 180
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०५/२०२१

पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील दिव्यांग कापड दुकानदार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कौटुंबिक वादातून मारहाण झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी पिंपळगाव हरेश्‍वर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील कापड दुकानदार प्रफुल्ल मांगिलाल राका (वय ५४) यांनी पिंपळगाव हरेश्‍वर पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यात त्यांनी म्हटले आहे की, आपण आपल्या कुटुंबासह लोहारा येथे वास्तव्यास आहोत. आमच्या मोठ्या मुलीचा येवला येथील हितेश विजय श्रीश्रीमाळ याच्याशी विवाह झाला असून तिथे तिला त्रास होत असल्यामुळे ती लोहारा येथे आमच्या घरी राहते. ती सध्या कोरोना पॉझिटीव्ह असल्याने पाचोरा येथील खासगी रूग्णालयात उपचार घेत आहे.

दरम्यान, दिनांक १३ मे रोजी दुपारी अडीच वाजेच्या आसपास प्रफुल्ल राका हे आपली पत्नी व नातवंडांसह घरात असतांना दोन महिला बळजबरीने घरात शिरल्या. त्यांनी आपल्याला साड्या खरेदी करायच्या असल्याचे सांगीतले. याला राका यांनी लॉकडाऊनमुळे दुकान बंद असल्याचे कारण देऊन नकार दिल्यावर त्यांना दमदाटी करण्यात आली. या महिलेने कुणाशी तरी फोनवरून वार्तालाप केला. यानंतर सहा-सात जण घरात आले. यात त्यांच्या मुलीचा पती हितेश विजय श्रीश्रीमाळ, सासरे विजय भंवरलाल श्रीश्रीमाळ, दीर विजय सुयोग श्रीश्रीमाळ यांच्यासह चार जण तोंडाला रूमाल बांधून घरात शिरले. त्यांनी प्रफुल्ल राका, त्यांची पत्नी आणि नातवंडाना मारहाण केली. तसेच त्यांनी कपाटातून पाच तोळ्यांचा चपलाहार आणि २० हजारांची रोकड हिसकावून घेतली. काही वेळात शेजारचे लोक आल्यानंतर हे सर्व जण पळून गेले असे या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या संदर्भात पिंपळगाव हरेश्‍वर पोलीस स्थानकात हितेश विजय श्रीश्रीमाळ, सासरे विजय भंवरलाल श्रीश्रीमाळ, दीर विजय सुयोग श्रीश्रीमाळ यांच्यासह चार अज्ञात पुरूष व दोन अज्ञात महिलांच्या विरूध्द फिर्याद दाखल करण्यात आली आहे. त्यांच्याविरूध्द भादंवि कलम ३२७, ४२७, ४४८, १४३, १८८, २६९, ३७(१); ३७(३) व १३५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मा.श्री. दिगंबर थोरात हे करीत आहेत.

परंतु याप्रकरणाची सखोल चौकशी होऊन आरोपींना कठोर शासन व्हावे अशी मागणी पंचक्रोशीतून होत आहे. कारण लहानश्या गावात बाहेर गावाहून येऊन थेट घरात घुसून जिवे मारण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ही उघड,उघड गुंडागर्दी आहे. असे लोहारा ग्रामस्थांचे म्हणणे आहे.



घरात हल्ला झाल्यानंतर घरातील वस्तुंची झालेली फेकझोक,तोडफोड व घरासमोर उभे असलेले हल्लेखोर छायाचित्रात दिसत आहेत.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

स्वर्गीय आप्पासो माजी आमदार ओंकार नारायण वाघ ...

Next Article

कुंदन बेलदार यांची महाराष्ट्र माझा न्युज चॅनेल ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • क्राईम जगत

    पाचोरा नगरपरिषदेतर्फे माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत प्लॅस्टीकच्या कॅरी बॅग वापरणारावर धडक मोहीम राबवून कडक कारवाई.

    December 16, 2020
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    कोल्हे येथे सामाजिक कार्यक्रमात दारुड्यांचा धिंगाणा.

    August 20, 2023
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पिंपळगाव हरेश्र्वर येथील गणेश पाटील यांच्या शेतातील झटका मशिन, सोलर प्लेट व बॅटरी लंपास.

    January 26, 2023
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    कुऱ्हाड गावात दारुडे घेतात लोटांगण, अवैधधंदे करणारांचे कोण करते पाठराखण. अवैधधंदे करणारे पोलिस कारवाईलाही जुमानत नसल्याचे चित्र.

    August 17, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedक्राईम जगत

    डोक्यात अवजड वस्तू मारून तलाठी पत्नीचा खून; निलंबित पोलीस पती गजाआड.

    November 30, 2020
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    अवैध धंद्यांना प्रतिष्ठितांचे पाठबळ, कारवाईसाठी पोलिसांची धावपळ. मुक्ताईनगर, बोदवड चौफुलीवर अन्न व औषध प्रशासनाने ५६ लाख ८३ हजारांचा गुटखा पकडला.

    March 15, 2023
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    दगडाच्या देवाचे मंदिर बांधणाऱ्यांनो मानवतेच्या भग्न मंदिराचा जीर्णोध्दार कधी करणार ? संतोष पाटील.

  • कृषी विषयक

    केळीला ‘रेटबोर्ड’ प्रमाणे भाव मिळावा याकरिता शेतकरी संघटनेचे पाचोरा तहसिलदारांना निवेदन.

  • क्राईम जगत

    पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची वॉश आऊट मोहीम सुरु, शिंदाड परिसरातील दारु निर्मिती अड्डा उध्वस्त.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज