“जारगाव चौफुली वरील अवैद्य धंदे व वाढती गुंडगीरी बंद करा” किशोर डोंगरे यांची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/१२/२०२१
पाचोरा शहरातील मध्यवर्ती चौक असलेली व शहरातील केंद्र बिंदू ठरलेली जारगाव चौफुली सद्यस्थितीत येथे देशी, विदेशी, गावठी दारु, सट्टा, मटका व पत्ता व सावकारी हे अवैध धंदे राजरोसपणे सुरु असून या अवैधधंद्याना हप्तेबाजीमुळे पाठबळ मिळत असल्याने या जारगाव चौफुलीवर एकप्रकारे गावगुंडाचे राज्य सुरु असल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.
पाचोरा शहरातील जारगाव चौफुली हे अति महत्त्वाचे ठिकाण असून या जारगाव चौफुलीवर जिल्हाभरातील प्रवासी पाचोरा शहरात येण्यासाठी व पाचोरा शहरातून बाहेरगावी जाण्यासाठी येऊन थांबतात. या कारणास्तव या चौफुलीवर हजारोच्या संखेने प्रवासी येत,जात असल्याने मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. नेमके याच वर्दळीच्या ठीकाणी सट्टा, पत्ता, जुगार, देशी दारु, गावठी व इंग्लिश दारुची खुलेआम चोवीस तास विक्री केली जाते.
यामुळे या परिसरात दारुड्यांसह इतर व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांची गर्दी असते. दारुडे दारु पिऊन या परिसरात गोंधळ घालतात या गोंधळाचा या परिसरातील नागरिक, व्यवसाई, वाहनचालक व प्रवाशांना खुपच त्रास सहन करावा लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे एस.टी.चा संप सुरु असल्याने मोठ्या प्रमाणात प्रवासी व शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनी येथे येऊन थांबतात. यांच्याशी हे दारुडे वाद घालतात किंवा मद्यपान जास्त घेतल्याने रस्त्यावरच लोळण घेतात. यांना कुणी समजवण्याचा प्रयत्न केल्यास हे दारुडे भांडण करत अश्लील शिवीगाळ करतात. या त्यांच्या गुंडागर्दीने सगळ्यांना त्रास सहन करावा लागत असून जारगाव चौफुली परिस्थितीत सर्व प्रकारचे अवैधधंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावे यासाठी आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. किशोर डोंगरे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
विशेष म्हणजे जळगाव चौफुली परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांची हिम्मत दिवसेंदिवस वाढत असून एका दारुड्याने दिनांक १३ डिसेंबर सोमवार रोजी रात्री ९:३० वाजेच्या दरम्यान आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते व सामाजिक कार्याकर्ते आयुष्यमान मा.श्री. किशोर डोंगरे हे जांरगाव येथे जात आसतांना एक समाज कंटक गावगुंडाने दारुच्या नशेत एक कुठलेही कारण नसतांना धिंगाना घालत जातीय व्देष बाळगून जातीवादक शिवीगाळ करत अंगावर धाऊन जात झटापट करण्याचा पर्यंन्त केला. तसेच त्यांच्या सोबत आसलेल्या कार्यकर्त्याशी हतापाई करुन शस्राचा धाक दाखवत जिवे ठार मारण्याची धमकी देत पसार झाला.
या घटनेमुळे जारगाव चौफुली परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आसुन. या घटनेचा सर्व सामाजिक स्थारातून निषेध होत आहे. हि घटना आंबेडकर चळवळीतील एका समाजसेकासोबत घडली आहे. तर मग सर्वसामान्य नागरिकांचे काय म्हणून संबंधित गुन्हेगाराचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी तसेच जारगाव चौफुली परिसरातील सर्वप्रकारचे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
घटना घडल्यानंतर निवेदन देण्यात आले असून सदर घटने बाबत पोलिस प्रशासन, ग्रमापंचायत, महसूल विभाग व राज्य उत्पादक शुल्क विभाग (दारु बंदी विभाग) काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून कारवाई न झाल्यास लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आयुष्यमान मा.श्री. किशोर डोंगर व परिसरातील व्यवसायीक व नागरिकांनी दिला आहे.