पाचोरा तालुक्यात ३२ पैकी २१ ग्रामपंचायतीवर महिला राज.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०२/२०२१
पाचोरा तालुक्यात काल दिनांक १३ फेब्रुवारी शनीवारी ९६ पैकी ३२ गावात सरपंच उपसरपंच पदासाठी निवडणूक झाली. यातील बहुतांशी ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडणूक झाली. पिंप्री बु” प्र. भ. येथे ९ सदस्यांपैकी एक जागा रिक्त असल्याने आठ जणांमध्ये निवडणूक होवुन ईश्र्वर चिठ्ठीद्वारे सरपंच म्हणुन मोनिका महेंद्र पाटील तर उपसरपंच म्हणुन अर्जुन दशरथ सोनवणे यांची लॉटरी लागली आहे.
१५ रोजी व १७ रोजी उर्वरित ३२ गावांमध्ये सरपंच, उपसरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे. वडगाव बु” प्र. पा. येथे ४ सदस्य सहलीला गेले असता भिमा सोमा भिल यांचे निधन झाले होते. याच वेळी उर्वरित तीन सदस्य परत आल्यानंतर सरपंच निवडीत जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील यांनी सरशी करुन दाखवली.
पाचोरा तालुक्यात गाळण बु” येथे राजेंद्र रामा सावंत (सरपंच), अनिल नाना शिंदे (उपसरपंच), वाणेगाव – मनिषा दिलीप पाटील (सरपंच), जिजाबाई रमेश सौसारे (उपसरपंच), शिंदाड – ज्ञानेश्वर महादु तांबे (सरपंच), नरेंद्र विक्रम पाटील (उपसरपंच), सांगवी प्र. लो. कुमारी दिप्ती संजय पाटील (सरपंच), सुमित्रा गुणवंत पाटील (उपसरपंच), डोंगरगांव – आशाबाई निवृत्ती पाटील (सरपंच), विजय दौलत पाटील (उपसरपंच), वरसाडे प्र. पा. – लिलाबाई शिवराम राठोड (सरपंच), बाबुलाल आनंदा चव्हाण (उपसरपंच), वडगांव बु” प्र. पा. – ललिता भगवान पाटील (सरपंच), भुषण प्रभाकर पाटील (उपसरपंच), बाळद – ज्योती भगवान सोमवंशी (सरपंच), सचिन भैय्यासाहेब सोमवंशी (उपसरपंच), गोराडखेडा बु” – ज्योती जनार्दन पाटील (सरपंच), विजय गोपीचंद पाटील (उपसरपंच), बदरखे – मनोहर अण्णा ससाने (सरपंच), प्रशांत सुभाष गढरी (उपसरपंच), नेरी – सचिन विश्वासराव महाले (सरपंच), मनिषा मनोहर पाटील (उपसरपंच), सावखेडा खु” – दिपमाला शिवाजी परदेशी (सरपंच), विनोद गणेश तडवी (उपसरपंच), नांद्रा – आशाबाई भिकन पाटील (सरपंच), शिवाजी रमेश तावडे (उपसरपंच), वरखेडी – अलकाबाई धनराज विसपुते (सरपंच), धनराज राजु पाटील (उपसरपंच), भातखंडे – दिनेश जगतराव पाटील (सरपंच), नुनेश काशिनाथ कुमावत (उपसरपंच), गोराडखेडा खु” – विमलबाई धनराज पाटील (सरपंच), संगिता रविंद्र पाटील (उपसरपंच), लोहटार – मनिषा संजय वाणी (सरपंच), योगेश शिवराम माळी (उपसरपंच), घुसर्डी – बाबुराव अनंतराव देवकर (सरपंच), दिपाली हेमराज घुमरे (उपसरपंच), शेवाळे – योगेश कौतिक पाटील (सरपंच), शांताराम रामचंद्र वाघ (उपसरपंच), माहेजी – कमलबाई पंडित पाटील (सरपंच), कैलास नारायण पाटील (उपसरपंच), सार्वे बु” प्र. लो. भगाबाई बळीराम पाटील (सरपंच), गजानन भानुदास (उपसरपंच), खडकदेवळा खु” – उषाबाई सुदाम वाघ (सरपंच), नामदेव पुंडलिक दाभाडे (उपसरपंच), कुऱ्हाड खु” – संगिता कैलास भगत (सरपंच), अशोक तुळशीराम देशमुख (उपसरपंच), वेरुळी बु” – कल्पना काशिनाथ पाटील (सरपंच), सविता अनिल पाटील (उपसरपंच), कोल्हे – अशोक पंढरीनाथ सुरळकर (सरपंच), मुन्नी समिर शिंदे (उपसरपंच), पहाण – छायाबाई वाल्मिक पाटील (सरपंच), भिवसन जयराम पाटील (उपसरपंच), सारोळा खु” – सिमा शिवदास पाटील (सरपंच), अर्चना सिद्धार्थ अहिरे (उपसरपंच), कळमसरा – अशोक नारायण चौधरी (सरपंच), सिताबाई योगराज वाघ (उपसरपंच), पिंप्री बु” प्र. भ. – मोनिका महेंद्र पाटील (सरपंच), अर्जुन दशरथ सोनवणे (उपसरपंच), परधाडे – शशिकांत रमेश पाटील (सरपंच), काशीबाई पंडीत भिल (उपसरपंच), कासमपुरा – सतिष शामसिंग परदेशी (सरपंच), शितल दिपक शिंदे (उपसरपंच) व अंतुर्ली खु” प्र. लो. प्रविणबानो अजिज पिंजारी (सरपंच), गुलाब दौलत पठाण (उपसरपंच) याप्रमाणे ३२ ग्रामपंचायतीत २१ महिला सरपंच पदी विराजमान झाल्या आहेत.
सांगवीत एम. बी. ए. झालेली युवती चालविणार गावाचा गाडा
सांगवी प्र. लो. येथे ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच सातही महिला बिनविरोध निवडून आणण्यासाठी एम. बी. ए. झालेल्या कु. दिप्ती संजय पाटील हिने प्रयत्न केले होते. अखेर सरपंच पदाचा बहुमान कु. दिप्ती पाटील हिला मिळाला असुन आपल्या उच्च शिक्षणाचा फायदा तिने गावासाठी करुन घेण्याचे ठरविले आहे.