सर्वज्ञ कृषी भांडार व ट्रेडर्सच्या उद्घाटन सोहळ्यासाठी, उद्या हवामान तज्ञ मा.श्री. पंजाबराव डख यांचे कुऱ्हाड गावात आगमन.

दिलीय जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०४/२०२२
शेतकरी आहे अन्नदाता तोच आहे, देशाचा खरा भाग्य विधाता.
*************************************
हा मुळ मंत्र घेऊन अंबे वडगाव येथील आदर्श शेतकरी मा. श्री. गुलाबराव कौतीक पाटील याचे सुपुत्र मा. श्री दिलीप पाटील यांनी पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द वरखेडी रस्त्यावर बसस्थान परिसरात सर्वज्ञ कृषी भांडार व ट्रेडर्स सुरु केले असून या सर्वज्ञ कृषी भांडार व ट्रेडर्सचा शुभारंभ दिनांक १३ एप्रिल २०२२ बुधवारपासून रोजी प. पु. प. महंत मा. श्री. येळमकर (मोठे बाबा) यांच्या शुभ हस्ते दिप प्रज्वलन करून हवामान तज्ञ मा. श्री. पंजाबराव डख साहेब यांच्या शुभ हस्ते सायंकाळी साडेपाच वाजता मोठ्या उत्साहात उदघाटन करण्यात येणार आहे.
या शुभ प्रसंगी श्री. अमितभाऊ संघवी (संघवी कृषी केंद्र पाचोरा) श्री. राजुशेठ बोथरा (हरेश्वर क्रॉप सायन्स) पिंपळगाव श्री. कृष्णा पाटील, श्री. सुभाषभाऊ शेठ (श्री. ट्रेडर्स पाचोरा) श्री. भटेश्वर बेलदारसाहेब ओझो अॅगी केअर प्रा.लि ASM. खान्देश रिजन पारस कृषी केंद्र, पाचोरा श्री. अमोल धनगर, श्री. दिलीप जैन (सत्यजित न्युज आंबे वडगाव) श्री. विरमान पाटील. (सर्वज्ञ कृषी केंद्र, आंबे वडगाव), श्री. प्रफुलशेठ बांठिया (श्रीगणेश कृषी केंद्र पाचोरा) श्री. प्रविण भोळे साहेब (ओझो ॲग्री केअर प्रा.लि ASM. आकोला), श्री. संजय देवरे (धनदाई कृषी केंद्र, आंबे वडगाव) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी सार्वे, जामने, कुऱ्हाड बुद्रुक, सांगवी, साजगाव येथील समस्त शेतकरी बांधव व शेतकरी शेतकरी बांधवांनी या उदघाटन प्रसंगी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच हवामान तज्ञ पंजाबराव डख साहेबांचे मोलाचे मार्गदर्शन ऐकावे अशी नम्र विनंती मा. श्री. गुलाबराव कौतिक पाटील, मा. श्री. दिलीप पाटील, मा. श्री. मुकेश पाटील यांनी केली आहे.
ठिकाण – सर्वज्ञ कृषी भांडार व ट्रेडर्स वरखेडी रस्ता बसस्टाप जवळ कुऱ्हाड कुऱ्हाड. भ्रमणध्वनी क्रमांक ९७६६१६६४९७.