काळे कृषी कायदे रद्द झाल्याबद्दल आज पाचोरा येथे काँग्रेसकडून दुपारी ४ वाजता जल्लोष.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/११/२०२१
सामील व्हा!! सामिल व्हा!! सामिल व्हा!!
(सचिन सोमवंशी, अमजद पठाण.)
शेतकर्यांवर अन्याय करणारे काळे कृषि कायदे रद्द करण्यासाठी भारतभर लढा उभारला गेला हे काळे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान यांनी केली हा लोकशाहीचा विजय आहे.
भारतभर लढा उभारला यात कॉंग्रेस चा प्रत्येक कार्यकर्ता हा शेतकर्यांच्या पाठीशी रस्त्यावर होता. कॉंग्रेस चे नेते खा. राहुलजी गांधी, आ नानाभाऊ पटोले यांनी वेळोवेळी पक्षाची बाजू खंबीर पणे शेतकर्यांच्या बाजुने घेतली. पंतप्रधान मोदींना लोकशाही च्या देशात लोकांसाठी झुकायला भाग पडले. सर्वसामान्य माणसाला खाण्यासाठी तेल आवश्यक आहे ते आता कमी होईल कारण जीवाश्यक वस्तू चा कायद्याची अंमलबजावणी पुन्हा होईल. या सार्यांसाठी जल्लोष करण्यासाठी पाचोरा काॅग्रेस छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज दि. १९ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता सर्वांनी उपस्थितीत रहावे असे आवाहन अध्यक्ष पाचोरा तालुका कॉंग्रेस
सचिन सोमवंशी, अॅड अमजद पठाण व शहर काँग्रेस पाचोरा यांच्यातर्फे करण्यात आले आहे.