पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी केले कुऱ्हाड शिवारातील गावठी दारु अड्डे उध्वस्त. महिलावर्गातून समाधान.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०३/२०२२
पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे यांना कुऱ्हाड गाव परिसरात मोठ्या प्रमाणात गावठी दारू निर्मिती व विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर त्यांनी आज रोजी कुऱ्हाड शिवारातील गावठी दारूच्या अड्ड्यांवर धाड टाकत गावठी दारू उद्ध्वस्त केले आहे.
या कारवाईमुळे कुऱ्हाड गाव परिसरातील तसेच पंचक्रोशीतील गावातून महिलांनी व सुज्ञ नागरिकांनी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांचे अभिनंदन केले असून या कारवाईत असेच सातत्य ठेवून कुऱ्हाड येतील गावठी दारू सह सर्व अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करावेत अशी मागणी केली आहे या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री महेंद्रजी वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल मा.श्री. रणजीत पाटील, पो.कॉ. मा.श्री. अरूण राजपूत व इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात.