कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीची किमयाच न्यारी, ग्राम विकासासाठी मिनी ट्रॅक्टर घेतले भारी.
सुनील लोहार.(कुऱ्हाड)
दिनांक~०४/०३/२०२२
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड (खुर्द) येथे ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोग निधीतून सुमारे चार लाख नव्वद हजार रुपये किंमतीचे मिनी ट्रॅक्टर खरेदी केला आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे कुऱ्हाड (खुर्द) हे गाव मोठ्या लोकसंखेचे गाव असल्याने भौगोलिक परिस्थिती विस्तारित आहे. या मोठ्या लोकसंखेच्या कुऱ्हाड गावात अनेक विकासकामे झाली असून आरोग्याच्या दृष्टीने सांडपाण्याच्या बांधण्यात आल्या आहेत. म्हणून गावात कायमस्वरूपी स्वच्छता रहावी याकरिता गटारींची स्वच्छता व दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात निघत असतात. या अनुषंगाने साफसफाई व इतर कामे तातडीने व वेळेवर व्हावीत म्हणून ग्रामपंचायतीने मिनी ट्रॅक्टर खरेदी केला आहे.
हे नवीन ट्रॅक्टर आणल्यानंतर आज सकाळी ट्रॅक्टर वितरक कंपनीकडून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणल्यानंतर कंपनीच्या वितरकांनी ट्रॅक्टरची चावी सरपंच सौ. संगीताताई कैलास भगत यांच्या सुपूर्द केली. नंतर सरपंच सौ. संगीताताई यांच्या हस्ते ट्रॅक्टरचे पुजन करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक युवराज अधांगळे, तलाठी भरत परदेशी, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण भाऊ पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य सदस्य कैलास भगत, ग्रामपंचायत सदस्य डॉ. प्रदीप महाजन, अशोक बोरसे, कौतिक पाटील, सुधाकर महाजन, अरुण बोरसे, शिपाई सिद्धार्थ सुरवाडे व बहुसंख्य ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.