अंबे वडगाव येथे मराठी मुलांच्या शाळेत, न्यूट्रीटीव्ह स्लाईसचे वाटप.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/१२/२०२१
शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत योजने शासकीय शाळामधील जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, शासकीय व कटक मंडळ शाळेतील विद्यार्थ्यांना न्युट्रीटीव्ह स्लाईस वाटप करणेबाबत प्रत्यक्ष कार्यवाही होत आहे. म्हणून या योजनेअंतर्गत अंबे वडगाव येथील जिल्हापरिषद शाळेला प्राप्त न्युट्रीटीव्ह स्लाईसचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.
हे वाटप शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. श्री. राहुल शेळके (भोला भाऊ) तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण प्रेमी सदस्य मा. श्री. शशिकांत पाटील यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना न्यूट्रीटीव्ह स्लाईसचे वाटप करण्यात आले. यामध्ये तांदूळ दोन, बाजरी एक, ज्वारी दोन, नाचणी एक, सोयाबीन एक, असे प्रति विद्यार्थी सात पॅकेटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चंद्रप्रभा सोनवणे, श्रीमती वृषाली सोनार, श्री दिनेश पाटील, तसेच मा.श्री. राजू पटेल सर सह इतर पालक उपस्थित होते.