पालकमंत्र्यांनाही कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्या प्रत्येकाने आपली तपासणी करुन घ्यावी. पालकमंत्र्यांची सुचना.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०१/२०२२
नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचाही कोरोना निदानाचा तपासणी अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे . गेल्या काही दिवसात आपल्या संपर्कात आलेले अधिकारी , कर्मचारी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदींनी आपली तपासणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी सर्वांना केले आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील हे काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सहभागी झाले होते . तेथे अनेक अधिकारी , कर्मचारी , आणि लोकांशी त्यांचा संपर्क आला होता, त्यामुळे सर्व संबंधितांनी गांभीर्याने लक्ष देऊन आपापली तपासणी करून घ्यावी असे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले आहे.
आज सकाळी त्रास जाणवू लागल्याने त्यांनी आपला स्वाब तपासणीसाठी पाठवला होता. आज दुपारी त्यांचा तपासणी अहवाल मिळाल्यावर ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. पालकमंत्री म्हणून त्यांचा नेहमीचा व्यापक जनसंपर्क लक्षात घेता, जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरीलही लोकांशी संपर्क येतो त्यामुळे आता सर्वांची तपासणी करून घ्यावी लागणार आहे.