सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व शिंदाड ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने रोगनिदान शिबिर संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०४/२०२२
सद्यस्थितीत वातावरणातील वाढते उष्णतामान यामुळे उत्पन्न होणाऱ्या नवनवीन व्याधी व त्यातच ग्रामीण भागातील हातमजूर, शेतमजूर व सर्वसामान्य लोकांना हाताला उद्योग नसल्याने हातात पैसा नाही. तसेच मागील वर्षापासून कोरोनाचा सामना करत करत डबघाईला आलेली परिस्थिती अश्या बिकट प्रसंगी जर घरात कुणी आजारी पडलेतर हातात पैसा नसल्याने व शहरात जाऊन उपचार घेण्यासाठी एस.टी.सेवा बंद असल्याने ग्रामीण भागातील जनतेला खुपच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नेमकी हीच समस्या जाणून घेत व आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना मनात बाळगून पाचोरा येथील सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व शिंदाड ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३ एप्रिल २०२२ बुधवार रोजी शिंदाड येथील श्रीराम मंदिर येथे भव्य असे रोगनिदान शिबिर घेण्यात आले.
शिबिराचे सुरवातीला जिल्हापरिषद सदस्य मा. श्री. मधुकर भाऊ काटे, सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल संचालक डॉ. मा. श्री. स्वप्नील प्रल्हादराव पाटील, डॉ. सौ. ग्रीष्मा स्वप्नील पाटील व मान्यवरांच्या हस्ते महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री. छत्रपती शिवाजी महाराज तसेच आरोग्याची देवता धन्वंतरी व श्रीराम प्रभूंच्या प्रतिमेचे पुजन करुन सकाळी साडेआठ वाजता शिबीराचे उदघाटन करण्यात आले.
या आरोग्य शिबिरात शिंदाड, सार्वे, पिंप्री व परिसरातील नागरिकांनी सहभाग नोंदवून ३५० जणांनी या शिबीराचा लाभ घेतला. या शिबिरात आलेल्या गरजू रुग्णांची डॉ.स्वप्निल प्रल्हादराव पाटील व डॉ. ग्रिष्मा स्वप्निल पाटील यांनी तपासणी करुन औषधोपचार केले. यावेळी शिंदाड गावचे सरपंच मा. श्री. ज्ञानेश्वर तांबे, उपसरपंच मा. श्री. नरेंद्र विक्रम पाटील, ग्रामपंचायत सदस्य मा. श्री. संदीप सराफ, मा. श्री. धना आपा, मा. श्री. विलास पाटील, डॉ. एस. आर.पाटील, डॉ. एल. टी. पाटील, डॉ. दीपक चौधरी, डॉ. अभिषेक पाटील, डॉ. राजेंद्र परदेशी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप बोरसे, कैलास दादा, बाळू श्रावने, सतिष बोरसे व सर्व आशा सेविका उपस्थित होत्या. परिसरातील नागरिकांसाठी सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ने आयोजित केलेल्या ह्या भव्य अश्या आरोग्य शिबिरा बद्दल ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी डॉक्टर स्वप्निल पाटील दादा यांचे आभार मानले.