जॉब कार्ड,घरकुल व इतर शासकीय योजना मिळवण्यासाठी कोणालाही पैसे देऊ नये.सभापती जलाल तडवी.

जामनेर(प्रतिनिधी)
दिनांक~३१/०७/२०२१
जॉब कार्ड, वैयक्तिक शौचालय, घरकुल व इतर शासकीय योजना मिळवतांना जॉब कार्ड काढण्यासाठी व ऑनलाइन करण्यासाठी लाभार्थ्यांच्या गरजेनुसार मजबूरीरीचा व अज्ञानपणाचा फायदा घेत काही ठिकाणी ग्राम रोजगार सेवक व पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेले काही कर्मचारी शंभर ते दोनशे रुपयांची मागणी करतात व पैसे न दिल्यास गरजू लाभार्थ्यांची अडवणूक करतात अशी तक्रार जामनेर पंचायत समितीचे सभापती मा.श्री.जलाल तडवी यांच्याकडे प्राप्त झाली आहे.
या तक्रारीची दखल घेत जॉब कार्ड काढणे, ऑनलाइन करणे व इतर कागदपत्रे काढण्यासाठी कोणीही पैसे मागितल्यास त्या लाभार्थ्यांने माजी मंत्री मा.श्री. गिरीशभाऊ महाजन,माजी सभापती मा.श्री.नवल पाटील, मा.श्री. आण्णा पिठोडे व त्यांचे कार्यकर्ते किंवा थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन सभापती मा.श्री. जलाल तडवी यांनी केले आहे
जामनेर तालुक्यातील बेघर लोकांना एकूण ३८ हजार २४२
पंतप्रधान घरकुल आवास योजने अंतर्गत मिळणार असून ती संभाव्य यादी प्रत्येक ग्रामपंचायतीला प्राप्त झाली आहे. या ३८ हजार २४२ घरकुल लाभार्थ्यांच्या यादीला आधार कार्ड आधीच लिंक झाले आहे. मात्र आता त्यांना जॉब कार्ड मॅपिंग करायचे आहे. एकूण लाभार्थ्यापैकी काही लाभार्थ्यांकडे जॉब कार्ड ऑनलाइन आहेत. मात्र अजूनही १८ ते २० हजार लाभार्थ्यांना कडे जॉब कार्ड नाहीत. ज्यांच्याकडे जॉब कार्ड नाहीत त्यांना नव्याने जॉब कार्ड काढून ऑनलाईन करत मॅपिंग करायचे आहे.
जॉबकार्ड ठराविक मुदतीत ऑनलाइन करुन मॅपिंग करायचे असल्याने तसेच बरेचसे लाभार्थी अशिक्षित व गरिब असल्याने या संधीचा व पंचायत समिती कार्यालयातील काही कर्मचारी अडवणूक करून शंभर ते दोनशे रुपयांसाठी अडवणूक करत असतील तसेच वैयक्तिक शौचालय, घरकुल, इतर योजनांसाठी अडवणूक करतांना आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा जामनेर पंचायत समितीचे सभापती जलाल तडवी यांनी दिला आहे.