पाटकऱ्याची करणी, धरणात नाही पाणी. कुऱ्हाड गावाला पाणी टंचाईचे ग्रहण.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०२/२०२१
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड शिवारातील पन्नाशे (वाकडी) व अंबे वडगाव जवळील कोकडी (म्हसाळा) धरणातून पाटकऱ्याच्या आर्शिवादाने रात्रंदिवस दिवसाढवळ्या पाणी चोरी करण्यात आल्यामुळे या दोघेही धरणापैकी कुऱ्हाड जवळीक पन्नाशे (वाकडी) धरणात आता फक्त साठाच शिल्लक राहिल्याने कुऱ्हाड खुर्द व कुऱ्हाड बुद्रुक गावांना जुन महिन्यापर्यंत पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याने ग्रामस्थांनी पाचोरा तहशिलदार श्री. कैलासजी चावडे यांच्याकडे तक्रार दिली आहे.
याबाबत कुऱ्हाड गावपरिसरातील ग्रामस्थांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की कुऱ्हाड जवळील पन्नाशे (वाकडी) व अंबे वडगाव जवळील कोकडी (म्हसाळा) धरणावर पाटबंधारे विभागाचे श्री.जगतराव पाटील. हे पाटकरी म्हणून काम पाहतात परंतु जगतराव पाटील. हे कर्मचारी मागील दहा वर्षापासून सतत याच धरणांच्या पाटाचे कामकाज पहात असल्याने धरण परिसरातील गाव शिवारातील शेतऱ्यांशी जवळीक निर्माण झाल्याने शेतकऱ्यांशी संधान साधुन आर्थिक लाभासाठी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी चोरी करण्यासाठी सुट दिल्याने या पावसाळ्यात शंभर टक्के पुर्ण भरलेल्या पन्नाशे (वाकडी) धरणात शून्य जलसाठा शिल्लक आहे.
या कारणांमुळे भविष्यात कुऱ्हाड खुर्द, कुऱ्हाड बुद्रुक या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी दुसरीकडे व्यवस्था नसल्याने भिषण पाणीटचाईला सामोरे जावे लागणार आहे. तसेच कुऱ्हाड खुर्द, कुऱ्हाड बुद्रुक, सांगवी, सागवी तांडा, म्हसास, कळमसरा, लाख तांडा या गावातील पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न समोर उभा राहिला आहे.
तरी संबंधित जगतराव पाटील. यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करुन या परिसरातून त्वरित बदली करावी अशी मागणी जनतेतून केली जात आहे.