म्हसास येथे आमदार निधीतून विविध विकास कामांचा शुभारंभ.

सुनील लोहार.(कुऱ्हाड.)
दिनांक~०४/०१/२०२२
कुऱ्हाड येथून जवळ असलेल्या म्हसास येथे जामनेर विधानसभा मतदार संघाचे आ.मा.श्री. गिरीश महाजन यांच्या आमदार निधीतून रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आज दिनांक ०४ जानेवारी मंगळवार रोजी दुपारी भाजपा नेते मा.श्री.संजय शांताराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
या विकास कामांमध्ये म्हसास गावातील कोळी गल्ली, राममंदिर ते विकास सोसायटी पर्यंतच्या रस्त्यांसाठी आमदार निधीतून साडे सात लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी आमदार मा.श्री. गिरीषभाऊ महाजन यांच्या निधीतून हनुमान मंदिर ते ज्ञानेश्वर पाटील यांच्या घरापर्यंत बसविण्यात आलेल्या पेव्हरब्लॉक कामाचेही लोकार्पण करण्यात आले.
या रस्ता क्रॉंक्रिटीकरण रस्त्याचा शुभारंभ व अगोदर झालेल्या कामाचे लोकार्पणाचे वेळी पाचोरा पंचायत समिती उपसभापती मा.श्री. कैलास चौधरी, कुऱ्हाड भाजपा गणप्रमुख मा.श्री. जगदीश तेली, कासमपुराचे माजी सरपंच मा.श्री. नितीन गवळी, भाजपा वैद्यकीय आघाडी जिल्हा प्रसिद्धीप्रमुख डॉ.मा.श्री.केयुर चौधरी, नाईकनगरचे सरपंच मा.श्री. जिभाऊ हटकर, म्हसासचे सरपंच मा.श्री. सुनील पाटील, माजी सरपंच मा.श्री. किसन पाटील, मा.श्री. राजू राठोड, परीट धोबी समाजाचे जिल्हाध्यक्ष मा.श्री. रमेश लिंगायत, मा.श्री. संभाजी चौधरी, मा.श्री. सुनील देशमुख, मा.श्री. लालचंद पाटील, मा.श्री. भगवान पाटील, म्हसास भाजप अध्यक्ष मा.श्री. चंद्रकांत पाटील, मा.श्री. विजय पाटील, मा.श्री. डिगंबर पाटील, मा.श्री.अण्णा पाटील, मा.श्री.संतोष कोळी, मा.श्री.काशिनाथ कोळी, मा.श्री.मधुकर पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
म्हसास येथील कोळी गल्ली ,राममंदिर, सोसायटी भागात रस्त्याची कामे होत असल्याने या भागाचा चेहरामोहरा बदलणार असल्याने ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.