शहीद जवान सुनील हिरे यांच्या राहत्या घरी खासदार उन्मेश दादा पाटील यांची सांत्वन भेट.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०६/२०२१
भडगाव तालुक्यातील खेडगाव येथील शहीद जवान सुनिल हिरे हे कर्तव्यावर असताना शहीद झाले. भडगाव तालुक्यातील खेडगाव येथील जवान इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलाचे सैनिक म्हणून देश बजावत होते. अरुणाचल प्रदेशातील तेजू या ठिकाणी कर्तव्यावर असताना दिनांक २२ जून रोजी ते शहीद झाले होते.खासदार उन्मेशदादा पाटील यांनी त्यांच्या राहत्या घरी जाऊन शहीद परिवाराची सांत्वन भेट घेतली. यावेळी शहीद जवान सुनिल हिरे यांची दोघे चिरंजीव राज अहिरे, विजय हिरे यांना आपल्याजवळ घेत खासदार उन्मेशदादा पाटील यांनी शहीद जवान यांच्या बद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी चाळीसगाव पंचायत समितीचे उपसभापती सुनील पाटील,सरपंच बापु गोकुळ , उपसरपंच भारती हिरे , ग्रामपंचायत सदस्य आबा महाले , भाऊसाहेब महाले , ज्ञानेश्वर गांगुर्डे , वसंत शिनकर लक्ष्मण माळी , विजय हिरे , दत्तु हिरे , संजय हिरे ( पत्रकार ) , विश्वास हिरे , उत्तम हिरे , समाधान हिरे , भगवान हिरे , शरद हिरे , विकी हिरे , सामजिक कार्यकर्ते नरेन्द्र काका जैन, विनायक वाघ , सर्वेश पिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.खासदार उन्मेश दादा पाटील यांनी शहीद सुनिल हिरे यांच्या पश्चात असलेल्या परिवारास लवकरात लवकर मदतीसाठी केंद्रांत प्रयत्नशिल राहील. असे सांगत देशसेवा देणारे जवान यांचेबद्दल तमाम भारतीयांना अभिमान असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी शहीद जवान सुनील हिरे यांच्या आठवणीना उजाळा देताना सर्वच उपस्थीत भावनीक झाले होते.