गरुड महाविद्यालयात भित्तिचित्रे प्रदर्शन व एड्स जनजागृती शपथ.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/१२/२०२१
जामनेर तालुक्यातील धी. शेंदूर्णी सेकं.एज्यु.को-ऑप् सो.ली.शेंदूर्णी संचलित अ.र.भा.गरुड कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या व आय.सी.टी.सी.दिशा केंद्र ग्रामीण रुग्णालय पहूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिन सप्ताह निमित्ताने एड्स जनजागृती शपथ व भित्तिचित्रांचे प्रदर्शन महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वासुदेव आर.पाटील हे होते. तसेच प्रमुख वक्ते म्हणून पहुर ग्रामीण रुग्णालायच्या डॉ.सोनल तायडे व टेकनिशीयन डॉ.देवकर यांनी उपस्थिती दिली. सदर कार्यक्रमात स्वयंसेवकांच्या वतीने एड्स जनजागृतीपर मानवी साखळी तयार करण्यात आली. त्यानंतर एड्स जनजागृतीपर भित्तिचित्रांच्या प्रदर्शनास सुरवात करण्यात आली.
प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.वसंत एन.पतंगे यांनी केले.
यानंतर उपस्थित स्वयंसेवकांना व मान्यवरांना रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.दिनेश प्रकाश पाटील यांनी एड्स जनजागृतीपर शपथ दिली. प्रमुख वक्त्या डॉ.सोनल तायडे यांनी आपल्या मार्गदर्शनात उपस्थित रासेयो स्वयंसेवकांना एच.आय.व्ही, एड्स याविषयी सखोल माहिती दिली. तसेच या आजाराची लक्षणे,उपचार,समुपदेशन व घ्यावयाच्या काळजी विषयी मार्गदर्शन केले.
या नंतर कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वासुदेव आर.पाटील यांनी केला.त्यांनी उपस्थित स्वयंसेवकांना महाविद्यालयातील रेड रिबन अंतर्गत होणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली व रासेयो विभाग राबवित असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो महिला सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.सुजाता सी.पाटील यांनी व आभार महिला विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.योगिता चौधरी यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात एकूण ११८ स्वयंसेवक व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य प्रा.डॉ.श्याम साळुंखे, प्रा.अमर व्ही.जावळे, प्रा.डॉ.प्रशांत देशमुख, प्रा.भूषण डी. पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.ए.एन जिवरग, प्रा.डी. एच.धारगावे, प्रा.संदीप द्राक्षे, प्रा.राहुल गरुड, प्रा.वर्षा पवार, प्रा.प्रतीक्षा गायकवाड, प्रा.एन.ए.शेख, प्रा.निकिता गरुड यांची उपस्थिती लाभली.