राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाचोरा तालुक्यात “कार्यकर्ता शिबीराचे” आयोजन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/१२/२०२१
आपल्या देशाचे नेते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाचोरा तालुक्यात राष्ट्रवादी “कार्यकर्ता शिबीराचे” आयोजन करण्यात आले असून हे शिबीर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा.श्री.दिलीपभाऊ वाघ यांचे अध्यक्षतेखाली व मा.श्री.संजूनाना वाघ यांचे मार्गदर्शनाखाली उद्या दिनांक ०९ नोव्हेंबर २०२१ गुरुवार रोजी सकाळी ठीक १०:३० वाजता महालपुरे मंगल कार्यालय पाचोरा येथे संपन्न होणार आहे.
तरी पाचोरा शहर व तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी व सर्व फ्रंटलचे पदाधिकारी, जबाबदार कार्यकर्ते, तसेच प्रत्येक गावातील राष्ट्रवादी चे ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन, सदस्य, तसेच विविध सहकारी संस्थाचे पदाधिकारी व सदस्य, सर्व शाखा अध्यक्ष व पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी न चुकता हजर रहावे अशी विनंती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पाचोरा तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक पाचोरा मा.श्री.विकास पाटील (सर) यांनी केली आहे.