शेंदुर्णी येथील गरुड महाविद्यालयातील खेळाडूंची ग्राफ्लींग कुस्ती क्रीडा प्रकारात राष्ट्रीय आणि कुस्ती प्रकारात राज्य पातळीवर निवड.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/०८/२०२१
दिनांक २७ व २८ २०२१ रोजी वैराग, तालुका बार्शी, जिल्हा -सोलापूर येथे पहिल्या राज्यस्तरीय ग्राफलिंग कुस्ती क्रीडा स्पर्धांचे सामने आयोजित करण्यात आले होते. सदर स्पर्धेत महाविद्यालयातील ७ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. सदर स्पर्धेत खेळाडूंनी घवघवीत यश प्राप्त करत एकूण सात पदक प्राप्त केले.
त्यामध्ये प्रथम भोई राजेंद्र रवींद्र -वरिष्ठ गट , शेख मोहसीन शेख मोबीन -प्रथम वरिष्ठ गट व खटके किशन शिवप्रकाश प्रथम -वरिष्ठ गट सोनवणे वैभव सोपान- वरिष्ठ गट प्रथम, कोळी सागर रमेश- सब ज्युनिअर गट प्रथम, चौधरी वेदांत विजय- सब ज्युनिअर गट प्रथम, वरील सर्व खेळाडूनीं सुवर्णपदक प्राप्त केले. तसेच वरिष्ठ गटात बेग मुबारक अनवर याने द्वितीय स्थान मिळवून रौप्य पदक प्राप्त केले. या खेळाडूंची निवड राष्ट्रीय स्पर्धेत होऊन या स्पर्धा छात्रसाल, दिल्ली येथे होणार आहेत.
यासोबतच महाविद्यालयातील खेळ विभागातील आनंदाची बातमी म्हणजे महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रियंका वनारसे हीची कुस्ती स्पर्धेत ५९ किलो वजन गटात पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याच स्पर्धेसाठी शेख मोहसीन शेख मोबिन याची ग्रिको रोमन आणि राजेंद्र भोई फ्री स्टाईल या क्रिडा प्रकारात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
यासोबतच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी वैभव हटकर आणि राजेंद्र भोई हे ग्राफलींग या क्रीडा प्रकारातील जिल्ह्यातील पाहिले पंच ठरलेले आहेत.
वरील सर्व खेळाडूंचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष श्री. संजयदादा गरुड ,संस्थेचे सचिव श्री. सतीशराव काशीद, संस्थेचे संचालक श्री. सागरकाका जैन, संस्थेच्या महिला संचालिका सौ. उज्वलाताई काशीद ,संस्थेचे सहसचिव श्री. दीपकभाऊ गरुड, संस्थेचे वस्तीगृह सचिव श्री. कैलासभाऊ देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव आर .पाटील व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी बंधु भगिनी यांनी अभिनंदन केले.
या खेळाडूंना डॉ. महेश आर .पाटील यांनी मार्गदर्शन केले.