कळमसरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०४/२०२२
पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने कळमसरा गावचे प्रथम नागरिक सरपंच या. श्री. अशोक दादा चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ. वंदनाताई चौधरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जामनेर तालुकाध्यक्ष डॉ. प्रशांत, या मान्यवरांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करुन मानवंदना देत अभिवादन करण्यात आले.
या शुभप्रसंगी कळमसरा गावत लवकरच अत्याधुनिक बौद्ध विहार (समाजमंदिर) बांधण्यात येणार असल्याचे कळमसरा गावचे सरपंच मा. श्री. अशोक दादा चौधरी यांनी जाहीर करताच बौद्ध बांधवांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. सौ. वंदनाताई चौधरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील संघर्षमय घडामोडींचा दाखला देत त्यांनी समाजासाठी, देशासाठी नव्हे तर संपूर्ण जगाला मानवतेची शिकवण देत शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या मुलमंत्राची आठवण करून देत आजच्या डिजिटल युगात संविधानाचे महत्व पटवून देत आपण कसे वागले पाहिजे याबाबत तरुण, तरुणींना योग्य मार्गदर्शन केले. तसेच डॉ. प्रशांत पाटील यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेक्रेटरी संजय चौधरी, संजय उशीर, बाबु निकम, चंद्रभान निकम, अनिल निकम, विजय निकम, प्राध्यापक गौतम निकम, ग्रामविकास अधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.