दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/११/२०२२

त्रिविक्रम देव त्रिभुवनाची जननी l
तो हा चक्रपाणि शेंदुर्णीत ||१||
परात्पर उभा माय अनाथाची
करावया साचो बिद्रावळी ||२||
हाचि दासांसाठी रूप नाना नटला
पंढरीसी झाला विठ्ठल हाचि ||३||
कडू म्हणे आम्हा पुरती साक्ष आली
विट ती देखीली येथे तेथे ||४||

जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी हे गाव म्हणजे अध्यात्मिक वारसा जपलेली पावन भूमी, स्वयंभू श्री. त्रिविक्रम भगवानांच अवतरण, संतश्रेष्ठ श्री. कडोजी महाराजांची भक्ती आणि भाविक भक्तांचा अखंड मेळा या सर्वांचाच मेळ म्हणजे प्रति पंढरपूर शेंदुर्णी नगरी, अशा प्रति पंढरपूर शेंदुर्णी नगरीतील संतश्रेष्ठ कडोजी महाराज यांच्या अभंगांचे पुस्तक रूपाने प्रकाशन “अभंगवाणी” या पुस्तकाच्या माध्यमातून मान्यवरांच्या हस्ते कडोजी महाराज संस्थान शेंदुर्णीच्या वतीने करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय श्री. संजय दादा भास्करराव गरुड हे होते. सुरुवातीला कडोजी महाराज मंदिरात आयोजित या कार्यक्रमात संत कडोजी महाराज आणि भगवान पांडुरंग परमात्मा यांचे पूजन करून ऑडिओ स्वरूपातील आरतीचे विमोचन करण्यात आले. या आरती ध्वनिफिती करण्यासाठी खांन्देशचे सुपरस्टार या. श्री. सचिनजी कुमावत यांचे अनमोल सहकार्य प्राप्त झाले. ही महाराजांची आरती गायक कु. सेजल रवींद्र बोरकर यांनी गायली आहे.

तदनंतर कडोजी महाराज यांनी २८० वर्षांपूर्वी लिहून ठेवलेल्या अभंगांचा एकत्रित भक्ती रस म्हणजेच “अभंगवाणी” या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर पुस्तकास सुप्रसिद्ध कीर्तनकार, श्री. संत सेवक मारुती महाराज कुरेकर बाबा, शिक्षक, वारकरी शिक्षण संस्था आळंदी वय १०५ वर्ष यांचा अभिप्राय आणि शुभेच्छा प्राप्त झालेल्या असून त्याचाही समावेश पुस्तकात करण्यात आलेला आहे.

कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना मा. श्री. उत्तमदादा थोरात यांनी शेंदुर्णी नगरीचा इतिहास सांगत आध्यात्मिक आणि पारंपारिक वारसा प्रतिपादित केला. त्याचप्रमाणे महाराजांची आरती लिहिणारे कै. भीमराव मामा पाराळकर यांच्याही आठवणींना उजाळा दिला. माननीय सागरमलजी जैन यांनी आपल्या मनोगतात “अभंगवाणी” जास्तीत जास्त तरुण पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी एखादी स्पर्धा आयोजित करण्याची सूचना मांडली. अभंगवाणी प्रकाशनाच्या कार्यात सातत्याने मदत करणारे ह.भ.प. भागवत महाराज शिरसोलीकर यांनी कडोजी महाराजांचे कार्य विशद केले.

मा. अमृत बापू खलसे यांनी त्यांच्या मनोगत संस्थान गादीवारच आणि प्रकाशन कार्याला मदत करणाऱ्या सर्वच सहभागींचे अभिनंदन करत अध्यात्मिक उत्कर्षासाठी संपूर्ण सहकार्याची भावना व्यक्त केली. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मा. श्री. संजय दादा गरुड यांनी दु. आ. तिवारी, श्री. ना. धो. महानोर यांच्याही कार्यांचा उल्लेख केला. सदर पुस्तक जास्तीत जास्त समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्याचा आशावादही त्यांनी व्यक्त केला. चिरंजीव अर्णव तुषार भगत यांनी संतांवरील अभंग सादर केला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ह. भ. प. शांताराम महाराज भगत यांनी कार्यक्रमाचा उद्देश प्रतिपादित करीत कडोजी महाराजांचे कार्य भारत भर पोचवण्याचा मानस व्यक्त केला.

या कार्यक्रमास श्री. सुधाकर अण्णा बारी, श्री. शांताराम बापू गुजर, श्री. राजेंद्र चौधरी, हभप निंबाजी महाराज भगत, हभप प्रल्हाद महाराज भगत, हभप ईश्वर महाराज भगत , हभप रामेश्वर महाराज, श्री. सोपान भाऊ चौधरी, श्री. तुषार भगत, श्री. रमेश चौधरी, पत्रकार बंधू त्यामध्ये श्री अतुलजी जहागीरदार, श्री. देवेंद्रजी पारळकर,श्री. युवराज सूर्यवंशी, श्री. संतोष चौधरी, श्री. सोनार यांनी उपस्थिती दिली.

*एंजियोप्लास्टी क्या है और कैसे होती है ?* – https://youtu.be/dp1JF3b_mJA
सदर अभंग वाणी पुस्तकाचे संपादन ह. भ. प. शांताराम महाराज भगत, आठवे गादीवारास आणि वहिवाटदार संत कडोजी महाराज संस्थान, शेंदुर्णी यांनी केले आहे. पुस्तकातील अभंगांचे संकलन आणि संकल्पना ही हभप प्रा.डॉ योगिता चौधरी (भगत) यांची आहे. पुस्तक प्रकाशनसाठी चौधरी प्रेस वरखेडी यांचे मालक श्री. भानुदास चौधरी, श्री. स्वप्नील चौधरी, श्री. रोहित चौधरी यांचे अनमोल सहकार्य प्राप्त झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता भगत यांनी केले. आणि आभार सुषमा भगत यांनी मानले. कार्यक्रमासाठी गावातील भाविक भक्त, महाराज मंडळी, विद्यार्थिनी यांची उपस्थिती लाभली.