शासकीय कापूस खरेदी केंद्र त्वरित सुरु करण्यात यावे = संभाजी ब्रिगेड पाचोरा
कापुस खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे; संभाजी ब्रिगेड यांचे प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले
पाचोरा (प्रतिनिधी)
या वर्षी सततच्या पावसाने व निसर्गाच्या लहरीपणा मुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या घरात जो काही थोडा फार कापुस आहे.पिक घेण्यासाठी शेतकऱ्याने लावलेला पैसा अपेक्षेप्रमाणे पुरेपुर मिळाला नसुन शेतकरी हवालदिल झाला आहे.व आर्थिक संकटात सापडला असल्याने आलेला कापुस तात्काळ विकणे गरजेचे आहे.त्यात शासकीय कापुस खरेदी केंद्र नसल्याने सदरचा कापुस व्यापारींना विकणे भाग पडत असुन तो कापुस व्यापारी कमी भावात घेत असून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत आहे.
शासनाचे कापुस खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला असून व्यापारी त्यांचा गैरफायदा घेत आहेत.कापुस खरेदी केंद्र तातडीने सुरू करावे.अन्यथा संभाजी ब्रिगेडला शेतकऱ्यांसाठी आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल या आशयाचे निवेदन संभाजी ब्रिगेड पाचोरा यांचा वतीने प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, यांना देण्यात आले.निवेदन सोशल डिस्टंन्सिन चे पालन करत देण्यात आले.त्यावेळी पाचोरा तालुका अध्यक्ष जिभाऊ पाटील,शहर अध्यक्ष सुरेश शिंदे, उपतालुकाप्रमुख संजय राठोड, कार्य अध्यक्ष सर्जेराव पाटील,उपशहर अध्यक्ष. सचिन पाटील, सचिव विशाल परदेशी, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष मोशिन पिंजारी, संपर्क प्रमुख गफ्फार पटेल,विजय जाधव,अमरशिंग पाटील, हेमराज पाटील,रहिस शेख, गट प्रमुख गोपाल पाटील- कोल्हे
उपस्थित होते.