रुग्णसेवेत अग्रेसर जळगाव येथील माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी
दिलीप जैन. ( पाचोरा )
जळगाव येथील रुग्णसेवेत अग्रेसर असणारी केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढीत आता सिंगल डोनर प्लेटलेट्स (SDP) ची सुविधा उपलब्ध…..
बुधवारी दिनांक २१/१०/२०२० रोजी सकाळी सिंगल डोनर प्लेटलेट (SDP) उपकरणाची चाचणी घेण्यात आली,त्यानंतर (A+) positive रक्तगट असलेल्या अयाज मोहसीन व माधवराव गोळवलकर रक्तपेढीचे व्यवस्थापक श्री जितेंद्र शाह यांनी (o+) प्लेटलेट्स (SDP) दान केले. यावेळी मुंबई येथील आदील शेख (इंजिनीयर),रक्तपेढीचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. नलिनी वैद्य,व्यवस्थापक श्री जितेंद्र शाह, पर्यवेक्षक सुधीर गजऋषी, तंत्रज्ञ मधुकर सैंदाणे, सौ.जागृती लोहार, व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
या निमित्ताने प्रथम डोनर(दाते) अयाज मोहसीन यांचा रक्तपेढी तर्फे अभिनंदन आणि सत्कार करण्यात आला.
सध्या डेंगू चे रुग्ण वाढत असून, सिंगल डोनर प्लेटलेट्स (SDP) ची आवश्यकता भासत आहे तरी गरजू रुग्णांनी माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढीशी संपर्क साधावा.