पदवीधर मतदार यादीत ०७ नोव्हेंबर २०२२ पर्यंत नाव समाविष्ट करुन घ्यावे मा. तहसीलदार पाचोरा यांचे अवाहन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/१०/२०२२

माननीय मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे कडील दिनांक १४ जुलै २०२२ नुसार दिनांक १ नोव्हेंबर २०२२ या अर्हता दिनांकावर आधिरीत पदवीधर मतदार संघाच्या याद्या नव्याने तयार करणेबाबतचा कार्यक्रम घोषीत केला असून जळगांव जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात दिनांक १ अक्टॉबर २०२२ ते ७ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत राबविण्यात येत आहे.

या अंतर्गत पाचोरा तालुक्यातील पात्र पदवीधर नागरीकांना आव्हान करण्यात येते की, दिनांक ०१ नोव्हेंबर २०२२ पुर्वी (अर्हता दिनांक) किमान तिन वर्ष अगोदर म्हणजे दिनांक ०१ नोव्हेंबर २०१९ पुर्वीची भारतातील विद्यापिठाची एकतर पदवीधर असेल किंवा त्याच्याशी समकक्ष असलेली अर्हता धारण करीत असेल अशी प्रत्येक व्यक्ती पदवीधर मतदार नोंदणी यादीत नाव समाविष्ट करण्यास पात्र आहेत.

त्यासाठी संबंधीत पात्र व्यक्ती यांनी आपले रहिवास भागातील संबंधीत मंडळ अधिकारी किंवा तहसिल कार्यालय पाचोरा येथील निवडणूक शाखेतून पदवीधर मतदार नोंदणी कामी फॉर्म नमुना नंबर १८ प्राप्त करून घ्यावा. सदर नोंदणी कामी फॉर्म सोबत वरील नमुद केलेल्या कालावधीची प्राप्त केलेल्या पदवीसंबंधी पदवीका प्रमाणपत्र / गुणपत्रीका तसेच तो मतदार संघातील सर्वसाधारण रहिवासी असावा तसेच रहिवासी पुरावा म्हणुन (मतदार ओळखपत्र / आधार कार्ड / पासपोर्ट / वाहन चालक परवाना / वीज-पाणी-गॅस जोडणीचे देयक इत्यादी) कागदपत्रातील नावात बदल असल्यास राजपत्र / विवाह नोंदणी प्रमाणपत्र / संबंधीत कायदेशीर पुरावा ( वरील कागदपत्रांची प्रत स्वयंसाक्षांकित व पदनिर्देशित अधिकाऱ्याकडून अधिप्रमाणित करून जोडणे आवश्यक ) तसेच पदवीधर मतदार नोंदणी फॉर्म नमुना नंबर १८ हा आपल्या रहिवास भागातील मंडळ अधिकारी यांच्याकडे जमा करावा असे सुचित करण्यात आले आहे.

तरी सदर कार्यक्रमात पाचोरा तालुक्यातील सर्व पदवीधर पात्र नागरीक तसेच शैक्षिणक संस्था, सहकारी संस्था, कंपन्या, क्लब्स, शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये यातील पात्र नागरीक/कर्मचारी यांनी जास्तीत जास्त पदवीधर मतदार यादीत नांव नोंदणी कामी भाग घ्यावा व आपली नोंदणी करावी असे अहवान पाचोरा तहसीलदार तथा पदनिर्देशत सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्यातर्फे करण्यात येते.

ब्रेकिंग बातम्या