एस.टी.चे खाजगीकर झाल्यास खेडेगावातील विदयार्थी येणार रस्त्यावर.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/११/२०२१
मुंबई राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर असून कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात आंदोलन पुकारले आहे. राज्य सरकारने आवाहन केल्यानंतरही संपकरी कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. संपावर तोडगा निघत नसल्याने राज्य सरकार आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारी आहेत.
परंतु एस.टी.चे खाजगीकरण झाल्यास खेडेगावातील विदयार्थ्यांना सवलतीच्या पासेस पासून वंचित रहावे लागणार असून मुलींसाठी मोफत सवलतीच्या पासेस खेडेगावातील विद्यार्थ्यांनींना मुकावे लागणार आहे. या कारणांमुळे खेडयातील मुलांना चांगल्याप्रकारेचे शिक्षण घेता येणार नाही. तसेच जेष्ठ नागरिक, दिव्यांगाच्या प्रवासाचा मोठा प्रश्न निर्माण होणार होण्याची शक्यता निर्माण होणार असल्याचे संकेत आहेत. कारण खाजगीकरण करतांना किंवा खाजगीकरण झाल्यानंतर या योजना व सवलती मिळतीलच किंवा खाजगीकरण करतांना शासन या बाबतीत सकारात्मक असेल हे मात्र निश्चित नाही.
तसेच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एस.टी.चा प्रवास सुरक्षित प्रवास असून खाजगीकरण झाल्यानंतर खेडेगावाकडे एस.टी. येईल किंवा नाही याची शाश्वती नसल्याची भीती व्यक्त केले जाते आहे.
म्हणून एस.टी.चे खाजगीकरण झाल्यावर विद्यार्थी संघटना, जेष्ठ नागरिक व दिव्यांग हे आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.