पिंपळगाव हरेश्वर लवकरच येथे कोविड लसीकरण सुरू होणार,(शालिग्राम मालकर) .
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०३/२०२१
पाचोरा तालुक्यातील महत्वाचे व साधारणता पंचवीस हजार लोकसंखेचे गाव म्हणजे पिंपळगाव हरेश्वर हे असून याठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे. या रुग्णालयात तिन वैद्यकीय अधिकारी, रुग्णवाहिका,आरोग्य सेविका, आरोग्य सेवक असा पुरेसा कर्मचारीवर्ग उपलब्ध असूनही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अद्यापही कोव्हीड तपासणी किंवा कोव्हीड लसीकरण करण्यासाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याने पिंपळगाव हरेश्वर सह पंचक्रोशीतील जनतेकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
गावात साधारणतः ३००० पेक्षा अधिक वृद्ध वय वर्ष ६० पेक्षा अधिकचे आहेत तर ४५ वयापेक्षा अधिक व्याधीग्रस्त सुद्धा १००० पेक्षा जास्त आहेत
या सर्वांना लसीकरणाची तात्काळ गरज असून गावात लसीकरणाची सुविधा उपलब्ध नसल्याने काही लोक जवळच्या वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात जातात, तिथे जाण्यायेण्यात वृद्धांचा, व्याधीग्रस्त नागरिकांचा वेळ वाया जातोय, कधीकधी वरखेडी फेरी वाया जाते, त्यात वेळ आणि पैश्याचा अपव्यय होवूनही वेळेवर लसीकरणाचा लाभ मिळत नव्हता.
याचीच दखल घेत पिंपळगाव हरेश्वर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष मा. श्री. शालिग्राम ओंकार मालकर यांनी मा.श्री. अभिजात राऊत जिल्हाधिकारी साहेब जळगाव यांच्याकडे पाठपुरावा करुन कोव्हीड तपासणी व कोव्हीड लसीकरण त्वरित सुरु करण्यासाठी मागणी लाऊन धरली