पाचोरा येथील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची गुणवत्तेसह क्रिडा क्षेत्रातही उत्तुंग भरारी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/१०/२०२३
पाचोरा येथील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलमध्ये गुणवत्तेसह विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधला जाईल यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. शिक्षणासोबतच सुदृढ व निरोगी राहण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध खेळांचे धडेही या शाळेत दिले जातात. आजपर्यंत गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी क्रीडास्पर्धा, वकृत्व स्पर्धा, बुध्दिबळ स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन तालुका, जिल्हा व राज्यपातळीवर नावलौकिक मिळवला आहे.
आता नुकत्याच २६ ऑक्टोंबर २०२३ रोजी क्रीडा व युवासेना संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक व्दारा आयोजित १७ वर्षा आतील वयोगटातील विद्यार्थ्यांच्या विभागस्तरीय बुध्दिबळ स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल हिरापूर रोड नाशिक येथे घेण्यात आल्या या स्पर्धेत पाचोरा येथील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या १७ वर्षा आतील मुलींनी सहभाग नोंदविला होता. या बुध्दिबळ स्पर्धेत आदिती संतोष अलाहीत या विद्यार्थीनीने नाशिक विभागातून विभागस्तरीय स्पर्धेत विजय मिळवलाने तीची आता राज्यस्तरीय बुध्दिबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
यानिमित्ताने आदिती अलाहीत हिचा व तीच्या पालकांचा सत्कार गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य मा. श्री. प्रेम शामदानी सर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित पर्यवेक्षिका सौ. अमेना बोहरा व शाळेतील शिक्षकवृंद यांनी अदितीला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच अदितीच्या या यशाबद्दल तसेच अदितीला बुध्दिबळ स्पर्धेसाठी धडे देणारे क्रीडा शिक्षक दिलीप चौधरी सरांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.