पाचोरा येथे ८ व ९ मे रोजी श्री. कैला मातेचा महोत्सव.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०५/२०२२
पाचोरा येथील श्री. कैला माता मंदिर संस्थान, भडगाव रोड येथे सालाबादप्रमाणे श्री. महिषासुर मर्दिनी सप्तमी व अष्टमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दोन दिवसीय श्री. कैला माता महोत्सवात दिनांक ८ मे २०२२ रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत श्री कैला माता करोलीवाली देवी च्या भक्तिमय गीतांचे जागरण तर दिनांक ९ मे २०२२ रोजी सकाळी ११ ते दुपारी अडीच वाजेपर्यंत भंडारा -महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
श्री. कैला माता मंदिराच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाला सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आशीर्वाद घ्यावा , असे आवाहन श्री कैला माता मंदिर संस्थानचे अध्यक्ष जगदीश शेठ माथुरवैश्य, तसेच कार्यवाह पुरुषोत्तम भाईसाहेब अग्रवाल, डॉ. अनुप अग्रवाल, व उत्सव समितीने केलेले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.