मनसेचे प्रशांत पाटील यांचे आंदोलन यशस्वी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/१०/२०२१
पाचोरा नगर परिषदच्या मुख्याधिकारी यांना वारंवार तक्रार अर्ज करून सुद्धा प्रभाग क्रमांक तीन मधील मूलभूत सुविधा गटारी रस्ते व स्वच्छता ची कामे झालेली नाहीत. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्र्यंबक नगर मध्ये एका ठिकाणी गटारीचे काम करण्यात आले होते. परंतु पहिल्याच पावसात पूर्ण गटार जमीनदोस्त झालेली होती. निकृष्ट दर्जाचे झालेले काम याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होते. प्रशासनाने झालेल्या कामाची चौकशी करावी सोबतच नवीन गटारी आणि रस्त्यांचे कामाकडे लक्ष द्यावे यासाठी मनसेचे प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वात दिनांक ५ ऑक्टोंबर पासून आमरण उपोषण सुरू केले होते.
गेली वीस वर्षे झाली कृष्णापुरी त्रंबक नगर भैरव नगर मधील रहिवासी नगरपालिकेचा कर हा वेळेवर भरतात. आज एकुण भरलेल्या कराची रक्कम वीस वर्षांमध्ये एवढी झालेली आहे की या भागातील नागरिकांनी भरलेल्या कराच्या रकमेतून मूलभूत गरज जसे गटारी वर असते ते नक्कीच करून घेऊ शकले असते. परंतु त्रंबक नगरमध्ये कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नसल्याने
यासंदर्भात नगरपालिकेला १५ सप्टेंबर रोजी तक्रारी अर्ज दाखल केला होता. नगरपालिकेकडून व बांधकाम विभागाकडून या अर्जाची कोणत्याही प्रकारे दखल घेतली नाही. म्हणून प्रशांत पाटील यांनी नगरपालिकेला दोन स्मरण पत्र दिली होती. तरीसुद्धा नगरपालिका मुख्याधिकारी व बांधकाम विभाग यांच्याकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही तक्रार अर्ज आणि स्मरण पत्र देऊनही जनसामान्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला जाग येत नसल्याने दिनांक ५ ऑक्टोंबर पासून प्रशांत पाटील यांच्यासह प्रभाग क्रमांक तीन मधील नागरिकांनी पाचोरा तहसील कार्यालयासमोर नगरपरिषद विरोधात आमरण उपोषण सुरू केले होते.
उपोषण स्थळी दुसऱ्या दिवशी नगरपरिषदेच्या वतीने उपमुख्याधिकारी मराठे, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले इंजिनियर सूर्यवंशी, पा.न. उपनगराध्य व शिवसेचे मुकुंद बिलदीकर,किशोर बारवकर, बापु हटकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आपल्या मूलभूत मागण्या लवकर पूर्ण होतील व येणाऱ्या १० दिवसात गटारीचे काम सुरू करू व १ नोव्हेंबरला प्रभाग क्रमां ३ मधील सर्व सस्त्यांचे काम सुरू करू प्रभागातील समस्यां बाबत एक तास चर्चा करुन त्या समजून घेत समस्या सोडवण्याचे लेखी आश्वासन देतो असे सांगत उपोषणकर्त्यांना उपोषण सोडवण्यासाठी विनंती केली त्या विनंतीस मान देऊन लेखी आश्वासन घेत मनसेचे प्रशांत पाटील यांनी उपोषण तात्पुरते मागे घेतले आहे.
========================================
हे यश माझे एकट्याचे नसून माझ्या पाठीशी खंबीपणे उभे असणारे प्रभाग क्र.३ मधील सर्व नागरिकांचे आहे त्याच सोबत मनसेचे विनय भोईटे साहेब व रावसाहेब कदम साहेब,अनिल वाघ,शेखरदादा पाटील,शुभम पाटील,ज्ञानेश्वर ठाकरे, जितेंद्र नाईक,शांताराम बोरसे ,श्याम राजपूत, कमलेश सोनार ऋषिकेश भोई,अनिल पाथरवट, सचिन पाटील. मनसेचे सर्व कार्यकर्ते यांनी मोलाची साथ दिली म्हणून आंदोलन यशस्वी झाले आहे असे प्रशांत पाटील यांनी सांगितले.