श्री.गो.से.हायस्कूल, पाचोरा येथे आॅनलाईन विज्ञान प्रात्यक्षिकांचा नाविन्यपूर्ण उपक्रम
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन. ( पाचोरा )
कोरोना काळात शाळा जरी बंद असल्या तरी श्री.गो.से.हायस्कूल पाचोरा येथील शिक्षकांनी आँनलाईन अध्यापन पद्धती वापरून विद्यार्थ्यांना शैक्षणीक लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहेत.त्याचाच एक भाग म्हणजे, विज्ञान प्रात्याक्षिक.शाळेतील सर्व विज्ञान विषयाचे शिक्षकांनी एकत्र चर्चा करून आँनलाईन प्रात्यक्षिक घेतल्याचे ठरले.त्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका सौ.प्रमिला वाघ, पर्यवेक्षक श्री.आर.एल.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ,श्री.आर.बी.बांठीया ,श्री.डी.डी.विसपुते,श्रीमती एम.एम.कोहोक,सौ.एस.टी.पाटील या शिक्षक, शिक्षिका यांनी परिश्रम घेवून आँनलाईन प्रात्याक्षिक यशस्वी केले.या उपक्रमाचे विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त केले असून, सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.