सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जिल्हा परिषदेकडून दत्त माध्यमिक विद्यालयाला कढलेली नोटीस वादळवाऱ्यात उडाल्याचा संशय.

  • अंबे वडगाव तांडा नंबर दोन येथील महादेव मंदिरावर बाबांचे पुनरागमन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

  • पिंप्री धरणावर अनाधिकृत ताबा घेऊन माती उचल करणाऱ्यांकडून सक्तीने वसूली.

  • पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या बदलीसाठी हरीभाऊ पाटील यांचा आंदोलनाचा इशारा.

  • पाचोरा पीपल्स बॅंकेने मुस्ताक पिंजारी यांना दिला पत्ता ठेवून झब्बू, वडिलोपार्जित घराची परस्पर विक्री.

कृषी विषयक
Home›कृषी विषयक›उद्याच्या जळगावातील मोर्चात पाचोरा व भडगाव तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचा सहभाग–अमोल शिंदे.

उद्याच्या जळगावातील मोर्चात पाचोरा व भडगाव तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचा सहभाग–अमोल शिंदे.

By Satyajeet News
October 31, 2021
136
0
Share:
Post Views: 43
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/१०/२०२१

जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयावर उद्या काढण्यात येणाऱ्या मोर्चात पाचोरा व भडगाव तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचा सहभाग असेल असे भाजपचे पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी सांगितले .

भाजपाच्यावतीने आमदार गिरीश महाजन, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या नेतृत्वात व पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे व भडगाव तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा किसान मोर्चाच्या माध्यमातून पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकरी १ नोव्हेंबररोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चातून समस्या मांडणार आहेत.

रब्बीच्या सुरुवातीसाठी पाण्याची गरज असतांना ट्रान्सफार्मर व वीज पुरवठा खंडित करून सक्तीची वीज वसुली थांबवावी. रात्री ऐवजी दिवसा शेतीला नियमित वीज पुरवठा करण्यात यावा. अतिपावसामुळे जाहीर झालेल्या तुटपुंज्या मदतीऐवजी वाढ करून दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई रक्कम जमा करावी. पिक विमा योजना सन २०२०- २०२१ अंतर्गत कापूस, उडीद, मुंग, सोयाबीन, इ. नुकसानग्रस्त पात्र शेतकऱ्यांची रक्कम तात्काळ बँक खात्यात जमा करण्यात यावी. सन २०१८ व सन २०१९ मध्ये आलेल्या चक्रीवादळ मुळे झालेल्या नुकसान भरपाईची प्रलंबित रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा करावी भडगाव तालुक्यात जून २०१९ मध्ये झालेल्या वादळी वारा व गारपिटीची तसेच मार्च २०२१ मध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या भरपाईची रक्कम तात्काळ बँक खात्यात जमा करण्यात यावी . पाचोरा व भडगाव तालुक्यात जनावरांवरिल लम्पी आजाराचा वाढता प्रादुर्भाव बघता प्रत्येक गाव पातळीवर जाऊन गुरांचे लसीकरण करण्यात यावी, अशा मागण्या शेतकऱ्यांसमोर मांडल्या जाणार आहेत.

याप्रसंगी जि.प. सदस्य मधुकर काटे, जिल्हाचिटणीस सोमनाथ पाटील , विधानसभा क्षेत्रप्रमुख हिम्मतसिंग निकुंभ,शहराध्यक्ष रमेश वाणी, किसान मोर्चा पाचोरा तालुकाध्यक्ष विश्वास पाटील, भडगाव तालुकाध्यक्ष यशवंत पाटील, सरचिटणीस गोविंद शेलार, संजय पाटील, दीपक माने, भाजयुमो तालुकाध्यक्ष मुकेश पाटील, शहराध्यक्ष समाधान मुळे, सुनील पाटील, भैया ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

वरिष्ठ कला महाविद्यालय गोंदेगाव येथे, कोव्हिड ~१९ ...

Next Article

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • कृषी विषयक

    वरखेडी येथील गुरांच्या बाजारात म्हशींच्या खरेदीविक्री ची परवानगी द्यावी पशुधन पालकांची मागणी.

    November 10, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    सावधान कोरोनाचं वाढतं संकट, गृह मंत्रालयाकडून नव्या गाईडलाईन्स जाहीर

    November 25, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    जळगाव जिल्ह्यात आजही ११४२ कोरोना बाधित रुग्ण आढळले तर १५ बाधितांचा मृत्यू.

    April 2, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    कोल्हे गावात अवैध दारु विक्रेत्याची पोलीस पाटलाला धमकी व ग्रामस्थांना शिवीगाळ.

    November 19, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    अंबे वडगाव खुर्द येथे वैकुंठधामचे भूमीपूजन संपन्न.

    December 14, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    October 26, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    भररस्त्यावर वाळूचा ढिग टाकल्याने अपघाताची शक्यता, महसूल प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा.

  • क्राईम जगत

    मोराड व शेंदुर्णी येथील धर्मस्थळांवर सुरु असलेला अंधश्रद्धेचा बाजार बंद होईल का ? सुज्ञ महिला व नागरिकांची मागणी.

  • पाचोरा तालुका.

    पाचोरा तालुक्यात भोंदू बाबांचा सुळसुळाट, अनेक महिलांची फसवणूक.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज