दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०४/२०२३

पाचोरा शहरातील भर बाजारपेठेतील सट्टा पेढीवर अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्री. देशमुख साहेबांनी आज दिनांक १३ एप्रिल २०२३ गुरुवार रोजी दुपारी दुपारी अंदाजे सव्वातीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास अचानकपणे धाड टाकुन नगरपालिकेच्या जागेवरील पत्र्याच्या टपरी वजा दुकानातून सट्टा पेढीचे साहित्य जप्त केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

या कारवाईमुळे अवैध धंदे करणारांचे धाबे दणाणले असून महिलावर्ग व सुज्ञ नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून अशीच कारवाई पाचोरा शहरातील इतर ठिकाणी व तालुक्यातील सुरु असलेल्या सर्व अवैध धंदे करणारावर करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
(याबाबत सविस्तर वृत्त थोड्याच वेळात.)