मयत आयुषच्या काकानेच दिली कबूली, संशयित काकाला अटक खूनाचे कलम वाढवले.
संशयित आरोपी
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/१२/२०२०
आज सगळीकडेच पैसा म्हणजे परमेश्वर, पैसा म्हणजे सगळे काही. अशि खुळी समजूत मनाशी बाळगून माणूस पैसा कमावण्यासाठी काहीही करायला मागेपुढे पहात नाही.
यातुनच भ्रष्टाचार, व्यभिचार, अनिती, बदल्याची भावना जन्म घेते. असाच प्रकार भडगाव तालुक्यातील वडगाव (सतिचे) येथे घडला पैशाच्या वादातून सख्ख्या काकानेच पुतण्याला कमरेत लाथ मारून विहिरीत ढकलल्याची कबूल पोलिसांना दिली आहे.
भडगाव तालुक्यातील वडगाव सतीचे या गावी बालकाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी मयत बालकाच्या मृत्यूप्रकरणी संशयीत काकाला अटक करण्यात आली असून खूनाचे कलम वाढवण्यात आले आहे.
पैशांच्या वादातून सख्ख्या काकाने आयुष दिपक गायकवाड या वडगाव (सतीचे) तालुका भडगाव येथील अवघ्या तीन वर्षाच्या बालकाचे अगोदर अपहरण करुन नंतर विहिरीत ढकलून दिल्याचा घटनाक्रम उघडकीस आला आहे. चोवीस तासात बालकाच्या मृत्यूचे गुढ उलगडण्यात पोलीस निरीक्षक अशोक उतेकर व त्यांच्या पथकाला यश आले आहे.
वडगाव (सतीचे) येथील दीपक गायकवाड यांचा मुलगा आयुष हा १४ डिसेंबरच्या दुपारपासून बेपत्ता झाला होता. त्याच्या बेपत्ता होण्यामुळे भडगाव पोलिस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास आयुष याचा मृतदेह विहीरीत आढळून आला होता. संशयाच्या बळावर त्याचा काका निलेश रामदास गायकवाड यास पोलिस पथकाने ताब्यात घेतले होते.
ताब्यातील संशयीत निलेश गायकवाड याची १५ डिसेंबर रोजी कसून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने आपला गुन्हा कबुल केला. भावासोबत असलेल्या पैशांच्या वादातून निरागस आयुषच्या कमरेवर लाथ मारुन त्याला विहीरीत फेकून दिल्याचे निलेश याने कबुल केले. या प्रकरणी भा.द.वि. ३०२ कलम वाढवण्यात आले आहे.