कळमसरा येथील मयताचे कुटुंबाला, जिल्हापरिषद सदस्य दिपकभाऊ राजपूत यांच्याकडून पाच हजाराची मदत.

दिलीप जैन.(कळमसरा)
दिनांक~२६/०९/२०२१
पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथे अल्पभूधारक शेतकरी मधुकर नेटके वय अंदाजे ५५ वर्षे हा शेतकरी त्याच्या शेत शिवारात आपली एक शेळी चारण्यासाठी गेला असता शेळी चारत असतांना शेळी अचानक पळाल्याने शेळी मागे पळत असतांना याच परिसरात कापूस पिकात जमीनीवर तुटून पडलेल्या विद्युत तारा व त्यातील प्रवाहाने या शेतकऱ्याला जोरदार शॉक (करंट) लागून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक २४ शुक्रवार रोजी सायंकाळी कळमसरा शिवारात घडली होती.
कळमसरा शिवारात या परिसरात तारा तुटून पडले असल्याची वारंवार तक्रार करुन सुध्दा विद्युत वितरण चे कर्मचारी व अधिकारी यांनी लक्ष न देता उडवाउडवीची उत्तर देत कोणतीही कामे केली नसल्यामुळे यांच्या हरामखोरा वृत्तीमुळे व मनमानी पद्धतीने कामकाज सुरु असल्यामुळे या निष्पाप शेतकऱ्याचा हकनाक बळी गेल्याने कळमसरा गावपरिसरातील नागरिकांनी संतप्त भावाना व्यक्त करत संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी जोरदार मागणी होती.
याची दखल घेत शिवसेनेचे जिल्हापरिषद सदस्य मा.श्री. दिपकभाऊ राजपूत, शिवसेना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा.श्री. अरुण भाऊ पाटील तसेच विद्यूत वितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता मा.श्री. आशीष राठोड व सहाय्यक अभियंता मा.श्री. विलास सिड्डाम यांनी घटनेची दखल घेत कळमसरा येथील मयताचे कुटुंबियांची सात्वनपर भेट घेऊन मा श्री. दिपकभाऊ राजपूत यांनी पाच हजार रुपयांचा धनादेश देऊन आर्थिक मदत केली. तसेच शासन दरबारी पाठपुरावा करून चारलाख रुपये लवकरच मिळवून देऊ असे आश्वासन दिले.
दिपकभाऊ यांनी धनादेश दिल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
याप्रसंगी विद्यूत वितरणच्या अधिकाऱ्यांनी कळमसरा ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत त्या लवकरच सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले.