डॉ.रितेश आर.पाटील यांना आरोग्य क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जळगाव येथे प्रदान.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०१/२०२२
सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था औरंगाबाद व माणुसकी रुग्णसेवा समुह शासकीय रुग्णालय घाटी यांच्या संयुक्त विद्यमाने पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य क्षेत्रातील डॉ.रितेश आर.पाटील यांना सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होते.
परंतु अर्जंट रुग्णसेवा असल्याने ते हजर राहू न शकल्याने आज दिनांक १५/०१/२०२२ रोजी जळगाव येथे समाजसेवक सुमित पंडित व माणुसकी टीम यांच्या हस्ते डॉ.रितेश पाटील सरांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी चेतन पाटील,कमलाकर माळी,हे उपस्थित होते.
डॉ रितेश पाटील यांचे कार्य खरच वाखाणण्याजोगे आहे,जळगावातील ३२ एचआयव्हीबाधित मुलांचे पालकत्व त्यांनी स्वीकारले आहे,आतापर्यंत २५० च्यावर मोफत आरोग्य शिबीर, मेडिकल साहित्य वाटप,दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना कपडे ,ब्लँकेट, साड्या,स्वेटर,बेडशीट,वाटप करणे.विशेष म्हणजे महाराष्ट्रातील अनेक रुग्णांना मुतखडा ,स्पाईन यावर ऑपरेशन न करता यशस्वी उपचार केले आहेत या सर्व कार्याची दखल घेऊन आरोग्य क्षेत्रातील सेवा गोरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.यामुळे डॉ.रितेश पाटील सरांचे सर्व समाजामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे.