पाचोरा तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागात रेशन कार्ड बनवणाऱ्या दलालांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट.`हरीभाऊ पाटील` यांचा आरोप.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०९/२०२१
पाचोरा तहसिल कार्यालयातील अधिकाऱ्यांना हाताशी धरुन मोठ्या प्रमाणात रेशन कार्ड बनवुन देणाऱ्या दलालांचा घोळखा पाचोरा पुरवठा विभागात सतत बघायला मिळतो तसेच दलाला मार्फत रेशनकार्ड बनवून घेतांना नियमानुसार २२/०० रुपयात मिळणाऱ्या रेशनकार्डसाठी गरजूंची अडवणूक करत तसेच वर साहेबांनाही द्यावे लागतात असे सांगत २००० रुपये घेऊन लवकरात लवकर ऑनलाइन करुन देत त्या कार्डधारकांना दिड महिन्याचे आतच धान्य मिळेल अश्याप्रकाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
नागरिकांन कडुन घेतले जातात आणि ते रेशन कार्ड पुरवठा अधिकारी ही तात्काळ ऑनलाईन करुन देवुन त्या रेशन कार्डावर धान्य ही दिड महीन्याच्या आत सुरु केले जाते
एखादा नागरीक स्वता रेशन कार्ड बनवण्यासाठी गेला तर त्या नागरिकाला दोन चार महीने खेटरा माराव्या लागतात तरि देखील त्या नागरिकाला रेशन कार्ड मुदतीत तसेच वेळेवर मिळत नाही तसेच ते कार्ड ऑनलाईन आनलाईन करण्यासाठी अधिकारी दहा ठिकाणी वाकडा तिकडा होतो आणि ते रेशन कार्ड तात्काळ ऑनलाईन करत नाही त्या नागरिकांनी त्रस्त होवुन एखाद्या पदाधिकाऱ्यांला पुरवठा विभागात आणले तर ते पुरवठा अधिकारी त्या रेशन कार्डात जर सात नाव असले तर ते तिन नाव कमीकरुन (वगळुन) ते कार्ड ऑनलाईन नोंदणी करण्यास तयारी दर्शवितात पुरवठा अधिकारी हे सर्वात अगोदर दलाला मार्फत पुरवठा विभागात दाखल झालेले रेशन कार्ड चे प्रकरण तात्काळ मंजुर करुन सह्या करतात
आणि तात्काळ म.तहसिलदार साहेबांच्या सही ला ठेवतात नागरिकांमार्फत रेशन कार्ड च्या प्रकरणाकडे दोन तिन महीने ढुकुंन ही बघत नाही
अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरु असलेला दलालां धुमाकुळ म.तहसिलदार सो.पाचोरा यांनी हद्दपार करावा
आणि शासनाच्या नियमान्वे रेशन कार्ड चे किम्मंत 22 रुपये घेवुन ते रेशन कार्ड तात्काळ ऑनलाईन करुन त्या नागरिकांना धान्य तात्काळ पुरवठा करण्याचे नियोजन करावे
नागरिकांना शासनाच्या योजने व्दारे धान्य पुरवठा करण्यात येतो कोणत्याही अधिकाऱ्यांच्या घरातुन धान्य पुरवठा करण्यात येत नाही हे पुरवठा अधिकाऱ्यांनी अगोदर लक्षात ठेवावे आणि शासनाच्या योजनेच्या निकषा प्रमाणे मुदतीत योजनाचे नागरिकां पर्यत तात्काळ व पारदर्शक पणे पुरविण्यासाठी शासनाला व जनतेला अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे
अशा सावधानतेच्या विनंती वजा सुचना *बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशन पाचोरा यांचे तर्फे करण्यात येत आहे*
*आमच्या संघटने तर्फे अशा दलालांचे बारिक निरिक्षण करुन त्या दलालांचे गुप्त चित्री करण करुन पुरवठा अधिकारी यांचे निलंबित करण्यासाठी अंदोलनकरण्यात येईल कारण पुरवठा विभागात दलाल वाढीला मुख्य जबाबदार पुरवठा अधिकारी हेच असतात*
आपला
*श्री.हरिभाऊ तुकाराम पाटील*
संस्थापक अध्यक्ष
*बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशन पाचोरा*
[२६/९, ६:२५ म.उ.] हरीभाऊ: ज्या नारिकानां रेशन कार्ड बाबत खरोखर त्रास झालेला असेल अशा नागरिकांनी पाच रुपायांचे टिकीट लावुन आपली तक्रार *बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशन*च्या श्रीराम नगर जामनेर रोड येथील संपर्क कार्यालयात* तसेच प्रत्यक्ष 👉 *9890396443* ह्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधुन लेखी तक्रार प्रत्यक्ष कार्यालयात जमा करावी 🙏ही विनंती