सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • माजी जिल्हापरिषद सदस्य मा. श्री. मधुकर भाऊ काटे लोकमत लोकनायक पुरस्काराने सन्मानित.

  • वरसाडे तांडा येथील २६ वर्षीय तरुणाचा ट्रॅक्टर अपघात दुर्दैवी मृत्यू.

  • शेंदुर्णी शहरात गोळ्या, बिस्किटाच्या दुकानातून प्रतिबंधित गुटख्याची सर्रास विक्री कारवाईची मागणी.

  • जरंडी गावात भरवस्तीत वाहनात गॅस भरण्याचा अड्डा सुरु, मोठ्या अपघाताची शक्यता कारवाईची मागणी.

  • शिक्षणक्षेत्रातील लबाड लांडग्यावर कारवाई होणार का ? जळगाव जिल्ह्यातील सुज्ञ नागरिकांचा प्रश्न.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›डांभुर्णी परिसरात लांडग्यची दहशत, आजपर्यंत तीन शेळ्या फस्त. वनविभागाकडून उडवाउडवीची उत्तरे.

डांभुर्णी परिसरात लांडग्यची दहशत, आजपर्यंत तीन शेळ्या फस्त. वनविभागाकडून उडवाउडवीची उत्तरे.

By Satyajeet News
August 3, 2022
351
0
Share:
Post Views: 64
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०८/२०२२

पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या डांभुर्णी शेत शिवारात तसेच गाव परिसरात मागील काही दिवसापासून लांडग्याने धुमाकूळ घातला असून लांडग्याने आजपर्यंत तीन शेळ्या ठार केल्या आहेत. याबाबत वन विभागाला वारंवार कळवून सुद्धा वन विभागाकडून पाहिजे तसे सहकार्य मिळत नसल्याने डांभुर्णी, प्रिंप्री, वरखेडी परिसरातील शेतकरी, नागरिक भयभीत व संतप्त झाले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यात मागील काही महिन्यांपासून जंगली श्वापदांनी धुमाकूळ घातला असून मागील दोन महिन्यात वेगवेगळ्या शिवारात बिबट्याने हल्ला चढवत शेळ्यांचा खात्मा केला होता. तसेच आज दिनांक ३ ऑगस्ट २०२२ बुधवार रोजी पहाटेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील डांभुर्णी येथे विजय प्रकाश परदेशी यांच्या घराच्या मागील बाजूस गावाजवळील असलेल्या गुरांच्या गोठ्यात घुसून लांडग्याने एक शेळीच्या नरडा फोडून ठार केल्याची घटना घडली आहे. तसेच या पूर्वी उत्तम नारायण परदेशीं यांच्या दोन शेळ्या पंधरा दिवसा पूर्वी व राजू शामलाल परदेशीं यांची एक शेळी लांडग्याने फस्त केल्या आहेत.

हा हल्ला पाहून गोठ्यात बांधलेल्या इतर गुराढोरांनी हंबरडा फोडल्यामुळे संबंधित शेतकऱ्याने गोठ्याकडे धाव घेतली व मदतीसाठी आरडाओरडा केला हे पाहून लांडग्याने शेळी सोडून पळ काढला. परंतु या हल्ल्यात शेळी ठार झाली आहे. याबाबत संबंधित शेळी मालक शेतकऱ्याने वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे घडलेल्या घटनेचा तपशील कळवला असता तुम्ही ऑनलाईन अर्ज करा मग आम्ही पंचनामा करण्यासाठी येऊ असे सांगितले.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे संबंधित शेतकऱ्याने ऑनलाईन अर्ज करुन तशी प्रत वनविभागातील कार्यालयात दाखवली व संबंधित संपर्क साधून माहिती दिली असता आता तुम्ही ऑफलाईन अर्ज करा मग आम्ही पंचनामा करण्यासाठी येऊ असे सांगण्यात आल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

लवकरात, लवकर जागेवर येऊन घटनास्थळ व ठार झालेल्या शेळीचा पंचनामा न झाल्यास शेळीची दुर्गंधी सुटेल व कुत्रे त्रास देतील असे शेतकऱ्याचे म्हणणे असून पंचनामा झाल्याशिवाय नुकसान भरपाई मिळणार नसल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्याला इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पाचोरा वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी कार्यालयात कायमस्वरूपी हजर रहात नसून गरजू व अडचणीत असलेले किंवा वनविभागाबाबत काही माहिती विचारण्यासाठी शेतकरी, ग्रामस्थ, निसर्गप्रेमी, पशु, पक्षी प्रेमी वनविभागाचे कार्यालयात गेल्यावर अधिकारी व कर्मचारी भेटतीलच याची शास्वती नसते व भेटलेच तर ते कोणतीही समाधानकारक माहिती किंवा शंकेचे निरसन करत नसल्याच्या तक्रारी येत असून वरिष्ठ अधिकारी या बाबींकडे लक्ष देतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

शिंदे गटाचं दुसऱ्या पक्षात विलीनीकरण हाच एकमेव ...

Next Article

१५ ऑगस्ट सालाबादप्रमाणे साजरा करेल पण ‘हर ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    February 9, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    Sea green over seasons Fifth without dominion she’d

    July 16, 2015
    By SURAJ DEOHATE
  • Uncategorizedमहाराष्ट्र

    पोलीसांनी पत्रकारांना अडवू नये, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना दिल्या सुचवा.

    January 22, 2024
    By Satyajeet News
  • Uncategorized

    अंबे वडगाव येथील ३२ वर्षीय तरुणाचा अकस्मात मृत्यू.

    June 26, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    भडगाव, पाचोरा तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी घेतली आढावा बैठक.

    September 24, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    लोहारा येथे दुचाकी अपघात दोन गंभीर जखमी, दवाखान्यात एकच डॉक्टरची नियुक्ती असल्याने उपचारासाठी विलंब .

    July 25, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • महाराष्ट्र

    संतोष मर्गज यांच्या ‘रिमझिम पाऊसधारा” व्हिडीओ चाहत्यांच्या भेटीला

  • सांस्कृतिक

    नुतन वर्षात मानवा असे घडेल का ? (प्रासंगिक लेख किंवा बातमी स्वरूपात)

  • आपलं जळगाव

    लहुजी संघर्ष सेनेतर्फे अण्णाभाऊ साठे यांची ५२ वी पुण्यतिथी उत्साहात साजरी.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज