वरखेडी येथे महामानव डॉ. बाबासाहेबांना अभिवादन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/१२/२०२०
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने पंचायत समिती सदस्य मा.श्री.ज्ञानेश्वर सोनार यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
नंतर त्रिसरन पंचशील बुध्द वंदना व भिमस्तूस्ती म्हणून मानवंदना देऊन आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाचे शेवटी सरणेय गाथा म्हणून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
तसेच या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या पिंपळगाव हरेश्रर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ.निताजी कायटे यांनी बाबासाहेबांच्या जिवनातील महत्त्वाचे क्षण सांगून पून्हा असा महामानव होणे नव्हे असे भावना व्यक्त केल्या.
या प्रसंगी वरखेडी येथील श्री.राकेश पाटील. श्री.बाळू महादू पाटील, श्री.प्रकाश पाटील, श्री. दुर्गादास सोनार, श्री.सुनील पाटील, श्री.संजय पाटील.(फौजी), शेख.सुलेमान कुरेशी, श्री. प्रकाश वनारसे, श्री. दिपक बागुल. व असंख्य ग्रामस्थ हजर होते. />