पिंपळगाव हरेश्वर येथील जय भवानी मित्र मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात साजरा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०९/२०२१
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील जय भवानी महिला मित्र मंडळातर्फे यावर्षी गणेशोत्सव साजरा करण्यात आला आज अनंत चतुर्थीला गणपतीरायाचे मोठ्या भक्तीभावाने विसर्जन करण्यात आले.
पिंपळगाव हरेश्वर येथे प्रथमच महिलांनी जय भवानी महिला मित्र मंडळ स्थापन करून श्री गणेशोत्सव साजरा केला. या मंडळातील सर्व महिलांनी महिलांनी यथाशक्ती प्रमाणे वर्गणी जमा करून श्री गणेशाची स्थापना केली.
श्री गणेशाची स्थापना केल्यापासून दररोज सकाळी व संध्याकाळी आरती करून नैवेद्य वाटण्यात येत होता. अनंत चतुर्थीला दुपारी चार वाजता आरती व मनोभावे पुजन करुन कोरोनाच्या कालावधीत शासनाने ठरवून दिलेल्या अटी व नियमांचे पालन करत श्री चे विसर्जन करण्यात आले.
तसेच महिला मंडळातील महिलांनी स्वखर्चाने अन्नधान्य जमा करुन सहभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता. यात भाविक भक्त व बालगोपालांना दाळ,बट्टी सह गंगाफळाची भाजी व भाताचे जेवण दिले.याठिकाणी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचे कर्मचारी, ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी, पिंपळगाव हरेश्वरचे सरपंच मा.श्री. सुखदेव गिते सर,डॉ.मा.श्री.शांतीलाल तेली,मा.श्री. रवीजी गितेमा.श्री. परेश पाटील, मा.श्री. अलाउद्दीन तडवी, मा.श्री. बी.डी.पाटील सर,राहूल बडगुजर, बाजीराव गिते, मा.श्री. विनोद महाजन, मा.श्री. शिवदास पाटील, समस्त ग्रामस्थ व बालगोपालांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
गणेशोत्सव कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी बेबाबाई पाटील. ज्योती ताई धोबी. लताबाई पाटील.अर्चना ताई कोळी. कलाबाई हटकर.कासाबाई धोबी. निर्मलाबाई कोळी.मनीषाबाई शिंदे. आक्काबाई कोळी. अंजु तेली आशाबाई कोळी. गंगुबाई बडगुजर. मनीषा बडगुजर. संगीता बडगुजर.वैजताबाई पवार. मंगलबाई चौधरी. मनीषाबाई किशोर बडगुजर.प्रणिता पाटील.संगीता पाटील, रचना शिंदे.राजेश्वरी शिंदे.सोनाली कोळी. साक्षी कोळी.कावेरी कोळी.पूनम कोळी. साक्षी चौधरी.रीना चौधरी. सरला बडगुजर. उषा बडगुजर. गार्गी. पाटील चैताली विशू पवार चैताली तेली. दीदी चौधरी. पूर्वा पाटील प्रियंका बडगुजर यांनी अथक परिश्रम घेतले.