कोल्हे येथील स्व.आर.एस.बाफना. कृषी तंत्र पदविकेसाठी प्रवेश सुरु; जणून घ्या कुठे कराल अर्ज.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०९/२०२१
पाचोरा तालुक्यातील कोल्हे येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहमदनगर संलग्न स्वर्गीय आर. एस. बाफना कृषी तंत्र विद्यालय कोल्हे येथे कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम शेतकी डिप्लोमा दोन वर्षासाठी मराठी माध्यमातून उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश देणे सुरू असून याकरिता शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण, बारावी उत्तीर्ण, अथवा अनुत्तीर्ण शिक्षण झालेले असावे.
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शासकीय सेवेत नोकरीची संधी असून यात ग्रामसेवक, कृषी खाते, पाटबंधारे, वन विभाग जिल्हा परिषद, पंचायत समितीत स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होते.
प्रवेशासाठीची अंतिम दिनांक ९ सप्टेंबर २०२१ ही असल्याने इच्छुक होतकरु विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर संपर्क साधून प्रवेशासाठी व अधिक माहितीसाठी प्राचार्य मा.श्री. मिलिंद पाटील.(९३५९८०१०३१) मा.श्री.राहुलजी बाफना.(९८५०४७९१०८) मा.श्री.फकिरचंद पाटील.(९९७०७६१७७९) मा.श्री. मनोहर चौधरी.(९४२१४६३२७७) या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. रमेशचंद्रजी बाफणा यांनी केले असून सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
हॅलो कृषी ऑनलाईन : कृषी विद्यापीठांनी कृषी तंत्र पदविका व तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज ऑनलाईन मिळणार असला तरी तो संबंधित कृषी विद्यालयात ऑफलाइन सादर करावा लागणार आहे.
दहावीनंतर कृषी शिक्षणाची संधी देणारा तंत्र पदविका अभ्यासक्रम दोन वर्षांचा असून तो मराठी माध्यमातून असेल. कृषी तंत्रनिकेतन साठी इंग्रजी माध्यमातून तीन वर्षांचा अभ्यासक्रम राहील. आरक्षित प्रवर्गासाठी प्रवेश अर्जाचे शुल्क दोनशे रुपये तर खुल्या गटासाठी चारशे रुपये आहे. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सात दिवसांमध्ये शाळा सोडल्याचा दाखला सादर न केल्यास प्रवेश रद्द केला जाणार आहे. शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना १२% गुणांचा अधिभार मिळवण्याची ताजा सातबारा उतारा द्यावा लागेल. विद्यार्थ्यांचे पालक भूमिहीन शेतमजूर असल्यास नायब तहसीलदारांचे प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाची तंत्र पदविका व विद्यानिकेतनची ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया ९ सप्टेंबर पासून चालू असेल. त्यासाठी www.Mpkv.in या संकेतस्थळाची मदत विद्यार्थ्यांना घेता येईल.
अर्ज छाननीनंतर किंवा गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर तक्रार उपस्थित झाल्यास आपले विद्यार्थी तक्रार सादर करू शकतात त्यासाठी प्राचार्य यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक महाविद्यालयात निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे. विद्यालयाचा कनिष्ठ संशोधन सहाय्यक किंवा कृषी सहाय्यक तसेच वरिष्ठ किंवा कनिष्ठ लिपिक सदस्य म्हणून तर सदस्य सचिव याची जबाबदारी कनिष्ठ संशोधन सहायक शिक्षण किंवा कृषी सहाय्यक आकडे देण्यात आलेली आहे. असे सूत्रांनी सांगितले आहे.