दीपावलीनिमित्त पाचोरा शहरात येणाऱ्यांच्या स्वागतासाठी, सिंधी कॅम्प (कॉलनी) परीसरात उकीरड्यांचे ढीग.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/११/२०२३

आज धनत्रयोदशी (धन्वंतरी जयंती) आहे. यानिमित्ताने आज हिंदू संस्कृतीमध्ये सगळीकडे साफसफाई करुन दीपावलीनिमित्त घरांना रंगरंगोटी करुन घरासमोर रांगोळी टाकून संध्याकाळी पणतीच्या व विद्युत रोषणाईने सुशोभीकरण करुन निरोगी आरोग्यासाठी देवादिकांची आराधना करतो अशी दीपावली सणानिमित्त कपडे, मिठाई, फटाके व इतर सुखवस्तूंची खरेदी करण्यासाठी सगळीकडे धावपळ सुरु असल्याने बरेचसे खेड्यापाड्यातील लोक खरेदीसाठी पाचोरा शहराकडे येतात.

या आनंदाच्या भरात घरुन निघालेले महिला, पुरुष, बालगोपाल जेव्हा वरखेडी ते पाचोरा रस्त्यावरुन पाचोरा शहरात येतात तेव्हा पाचोरा शहराच्या पुर्वेकडील जामनेर ते पाचोरा रस्त्यावर असलेल्या सिंधी कॅम्प (कॉलनी) परिसरातील रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे मोठमोठे ढीग त्या ढीगाऱ्यावर खाद्याच्या शोधात धुमाकूळ घालणारे कुत्रे, डुकरे, गायी यांची गर्दी व विशेष म्हणजे उकीरड्यावर चरणारी ही जनावरे जेव्हा रस्त्यावर धावत सुटतात तेव्हा वाहनधारकांवर ओढवणारा जिवघेणा प्रसंग व होणारे अपघात यामुळे आनंदाच्या भरात पाचोरा नगरीत येणाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडते.

विशेष म्हणजे पाचोरा शहरातील सिंधी कॅम्प (कॉलनी) ही वस्ती म्हणजे शिकल्या, सवरल्या, सुशिक्षित व्यापारी वर्गांची वस्ती आहे. परंतु याच वस्तीत घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने या रस्त्यावरुन येणारे, जाणारे वाटसरु, प्रवासी तसेच सुज्ञ नागरिकांना एकच प्रश्न पडतो की या घाणीच्या साम्राज्याला जबाबदार कोण ? मग मनात एकच प्रश्न निर्माण होतो की या घाणीच्या साम्राज्याला पाचोरा नगरपरिषद जबाबदार आहे की शिकले, सवरले, सुशिक्षित व्यापारी वर्गातील रहिवासी जबाबदार आहेत.

*महत्वाचे*
(सिंधी कॅम्प (कॉलनी) परीसरात सिंधी बांधवांच्या वस्तीकडील रस्त्यावर उकीरडे दिसून येतात तर दुसऱ्या बाजूला समोरच इतर समाजबांधवांच्या वस्तीत स्वच्छता दिसून येते ही बाब विचारात घेण्यासारखी आहे.)

ब्रेकिंग बातम्या