पितृछत्र हरविलेल्या पल्लवीने एस.एस.सी.परिक्षेत १०० टक्के गुण मिळवून पटकावला प्रथम क्रमांक.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०७/२०२१
गेल्या तीन महिन्यांपुर्वी वडिलांचे अकाली निधन झाल्याचे दुःख पेलवत पल्लवी हिने एस.एस.सी.परिक्षेत १०० टक्के गुण मिळवून घवघवती यश संपादन करत पाचोरा तालुक्यातुन प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
पाचोरा येथील श्री.गो.से.हायस्कूलमधील शिक्षक शशिकांत ताराचंद लासुरकर यांचे गेल्या तीन महिन्यांपूर्वी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. वडिलांच्या निधनाचे दु:ख पल्लवी हिस न पेलवणारे असतांनाच तिने या दु:खद परिस्थितीचा सामना करत एस.एस.सी.परिक्षेत घवघवती यश संपादन केले.
पल्लवी शशिकांत लासुरकर ही येथील बुऱ्हानी इंग्लिश मिडियम स्कूलमधुन शिक्षण घेत नाशिक बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून पाचोरा तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. पल्लवी हिला बुऱ्हानी शाळेच्या मॅनेजिंग कमिटी, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.
पल्लवी ही श्रीमती संगीता शशिकांत लासुरकर व गो.से.हायस्कूल येथील शिक्षक कै.शशिकांत ताराचंद लासूरकर यांची कन्या व सेवा निवृत्त जिल्हा परिषद मुख्याध्यापक ताराचंद अर्जुन लासूरकर यांची नात आहे. पल्लवी हिचे सर्व स्तरावरुन अभिनंदन व कौतुक केले जात आहे.