रेमेडिसिव्हर इंजेक्शन व ऑक्सिजनच्या तुटवड्या बाब आमदार किशोर आप्पा पाटील यांनी घेतली तातडीची बैठक.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०४/२०२१
पाचोरा तसेच भडगाव तालुक्यासह जिल्हाभरात कोविड रुग्णांना ऑक्सिजन व रेमेडिसिव्हर इंजेक्शनचा भासणारा तुटवडा आणि यावर करावयाच्या उपाय योजनांबाबत आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील. यांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता प्रांताधिकारी कार्यालयात पाचोरा व भडगाव तालुक्यातील प्रमुख डॉक्टर्स, कोविड केअर सेंटर चालक, व मेडिकल डीलर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीला प्रांताधिकारी मा.श्री. राजेंद्रजी कचरेंसह प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थिती होती.
ऑक्सिजन व रेमेडिसिव्हर इंजेशनच्या तुटवड्या बाबत आमदार मा.श्री.किशोर आप्पा पाटील. यांनी थेट बैठकीतूनच आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे तसेच अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. राजेंद्र शिंगणे यांचेशी दूरध्वनीवरून संपर्क साधत मतदार संघासह जिल्ह्याची व्यथा मांडत आम्हाला प्राधान्याने रेमेडिसिव्हर इंजेक्शन व ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला द्यावेत अशी विनंती केली.
म्हणून दोघेही मंत्री महोदयांनी आमदार मा.श्री.किशोर अप्पा पाटील.यांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत तुम्हाला कोरोना नियंत्रणासाठी ऑक्सिजन व रेमेडिसिव्हर सह इतर वैद्यकीय साधन सामुग्रीची कमतरता भासू न देण्याचे आश्वासन देत सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले.
तसेच पालकमंत्री ना.मा.श्री. गुलाबराव पाटील. व जिल्हाधिकारी डॉ.मा.श्री.अभिजीतजी राऊत यांची भेट घेऊन जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने प्रश्न आजच मार्गी लावणार असल्याची माहिती आ.मा.श्री.किशोर पाटील यांनी दिली आहे.
आज झालेल्या बैठकीला तहसीलदार मा.श्री. कैलासजी चावडे, निवासी नायब तहसीलदार मा.श्री.संभाजी पाटील, नायब तहसीलदार मा.श्री. विकास लाडवंजारी, भडगावचे नायब तहसीलदार मा.श्री.एम. डी. मोतेराव,तालूका वैद्यकीय अधिकारी डॉ.मा.श्री. समाधान वाघ, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मा.श्री. अमित साळुंखे, भडगावचे डॉ.मा.श्री.प्रशांत पाटील, डॉ.मा.श्री. भूषणदादा मगर, डॉ.मा.श्री. स्वप्नील पाटील, डॉ.मा.श्री. नरेश गवांदे, डॉ.मा.श्री. प्रवीण देशमुख, डॉ.मा.श्री. प्रवीण माळी,
डॉ.मा.श्री. सागरदादा गरूड, डॉ.मा.श्री. संकेत विसपुते, डॉ.मा.श्री.जीवन पाटील,डॉ.मा.श्री। निलेश पाटील, मेडिकल असोसिएशनचे मा.श्री. राजेंद्र भोसले,मा.श्री. शरद मराठे,भडगावचे मा.श्री.सुरेश भंडारी, स्वीय सहाय्यक मा.श्री. राजेश पाटील, पि.बी.सी.संपादक मा.श्री. प्रवीणजी ब्राह्मणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत प्रारंभी आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील. यांनी सर्वप्रथम मतदार संघातील सर्व वैद्यकीय व्यवसायिक चांगले परिश्रम घेऊन दिवसभरातील अठरा अठरा तास काम करून कोरोना साथ नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
तसेच आपण आज पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याने तत्पूर्वी आपल्या देखील अडीअडचणी व समस्या जाणून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केल्याचे सांगत सर्व डॉक्टरांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी डॉ.मा.श्री. संकेत विसपुते यांनी ऑक्सिजनच्या पुरेश्या पुरावठ्या बाबत कैफियत मांडली तर डॉ. सागरदादा गरुड यांनी ऑक्सिजनचे वाढलेले दर, रेमेडिसिव्हर इंजेक्शन फक्त कोविड केअर सेंटर चालकांकडेच उपलब्ध करून घ्यावे अशी मागणी केली. तसेच डॉ.मा.श्री. भूषणदादा मगर ,डॉ.मा.श्री. जीवन पाटील,राजेंद्र भोसले,शरद मराठे आदींनी सांगोपांग चर्चा केली.
तसेच पाचोरा भडगाव मध्ये आजच्या परिस्थितीत दररोज एक हजार इंजेक्शनची गरज असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. ग्रामीण भागात काम करणाऱ्या डॉक्टर्स मंडळींनी देखील पेशंट अत्यवस्थ होण्याच्या आधीच त्यांना आवश्यक उपचार देण्यासाठी पुढे पाठवले पाहिजे तसेच गृह विलगिकरणात असलेले पेशंट अनेकदा बाहेर फिरत असल्याने त्यामुळे देखील प्रादुर्भाव वाढत असल्याचे मत बैठकित व्यक्त करण्यात आले.
तसेच प्रांताधिकारी कचरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्वच मेडिकल मध्ये असलेल्या रेमेडिसिव्हर इंजेक्शनचा साठा आम्ही तपासत असून या बाबत तहसीलदार माहिती घेत असल्याचे त्यांनी सांगितले तर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी डॉक्टर बांधवानी देखील केवळ आरोग्यसेविका किंवा तत्सम सहकारी कर्मचाऱ्यांवर विसंबून न राहता दिवसातून दोन तीन वेळा पेशंटची स्वतः तपासणी करावी, रक्तांचे नमुने नियमित तपासून इतर काही व्याधी वाढणार नाहीत याची दक्षता घेण्या सोबतच या अडचणीच्या काळात सर्वच घटकांनी माणुसकी दाखवत रुग्णांना जास्तीत जास्त दिलासा देण्याचे काम करावे, तसेच विविध चाचण्यांचे जादा दर आकारू नये.
शासनाने निर्धारित केलेल्या दरांतच उपचार करावे, असे आवाहन उपस्थित डॉक्टर्स बाधवांना केले.