श्रीमती भारती बेंडाळे-सावंत यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श महिला पोलीस पाटील पुरस्कार देऊन सन्मानित.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०८/२०२१
नुकतेच ०१ ऑगस्ट रोजी महसूल दिनी कृष्णापुरी-पाचोरा शहर भागातील पोलीस पाटील श्रीमती भारती बेंडाळे-सावंत यांना आदर्श महिला पोलीस पाटील म्हणून उपविभागीय अधिकारी तथा प्रांत श्रीयुत राजेंद्र कचरे साहेब यांच्या हस्ते सन्मानित करून गौरविण्यात आले. याप्रसंगी पाचोरा उपविभागीय अधिकारी तथा प्रांत श्रीयुत राजेंद्र कचरे साहेब,पुरवठा अधिकारी श्रीयुत आंधळे रावसाहेब,प्रांत ऑफिस मधील वरिष्ठ सहायक श्रीयुत कोळी रावसाहेब तसेच आमदार श्रीयुत आप्पासो किशोर पाटील यांचे स्वीय सहाय्यक श्रीयुत राजू पाटील तसेच वीज वितरण कँपनी चे माजी वरिष्ठ तंत्रज्ञ श्रीयुत प्रकाश बेंडाळे सामाजिक कार्यकर्ते श्रीयुत अनिल सावंत सर,इत्यादी उपस्थित होते.
श्रीमती भारती बेंडाळे-सावंत या हा पुरस्कार पटकविणाऱ्या पाचोरा तालुक्यातील पहिल्या महिला पोलीस पाटील आहेत हे विशेष तसेच कृष्णापुरी भागातील देखील पहिल्या महिला पोलीस पाटील म्हणून त्यांनी बहुमान पटकाविला आहे हे विशेष
श्रीमती भारती बेंडाळे-सावंत ह्या सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल सावंत यांच्या धर्मपत्नी असून त्यांचे विवीध क्षेत्रात कार्य उल्लेखनीय असून त्यांच्याच कामाची तसेच दोघी पती पत्नी यांची केलेल्या कामाची दखल शासनाने घेऊन त्यांना हा पुरस्कार दिला असून त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी अभिनंदन केले असून पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत