राजपूतसह इतर समाजबांधवांच्याही उन्नतीसाठी एकजुटीने काम करा, श्री राजपूत करणी सेनेच्या खान्देशस्तरिय मेळाव्यात उमटला सूर.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/१२/२०२०
जळगाव श्री. राजपूत करणी सेनेतर्फे राजपूत समाजबांधवांच्या उन्नतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. या संघटनेतर्फे राजपूतसह इतर सर्वसमावेशक समाजबांधवांना सुध्दा सोबत घेवून सर्व घटकातील बांधवांचा विकास साधावा. गरजूंपर्यंत योग्य ती मदत पोहचवावी, असा सूर श्री राजपूत करणी सेनेच्या विभागीय मेळाव्यात उमटला. हा मेळावा रविवारी वाघूर धरणाजवळील परेश रिसोर्ट येथे झाला.
व्यासपीठावर स्वामी रवींद्रसिंग महाराज, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्रसिंग चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्ष नंदा राजपूत, खान्देश विभागीय अध्यक्ष प्रवीणसिंग पाटील, विलाससिंग पाटील, विठ्ठलसिंग मोरे, गणेशसिंग राजपूत, मुंबई शहर उपाध्यक्ष दिलीपसिंग राजपूत, युवक जिल्हाध्यक्ष रंजनसिंग पाटील, जिल्हा संघटक गणेशसिंग राणा, जिल्हा उपाध्यक्ष बी.एच.खंडाळकर आदी उपस्थित होते.
समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा, सामूहिक विवाह सोहळा घेण्यात यावा. अनिष्ठ रुढी, परंपरांना फाटा देवून सुधारणावादी विचार अमलात आणावा. जातपडताळणी प्रमाणपत्राच्या कामात अनेक अडचणी येतात. त्या अडचणी सोडवणे व आरक्षणाविषयी आवाज उठवण्यात यावा. मुलींच्या शिक्षणावर व महिला सबलीकरणावर देखील भर देण्यात यावा, असे मत मनीषा पाटील, उज्ज्वला पाटील, आशा राजपूत, नंदा राजपूत यांनी व्यक्त केले.
*एकजुटीने संघटन वाढवा*
सर्व समाजबांधवांनी काही मतभेद, गट, तट असल्यास ते बाजूला ठेवून एकजुटीने सामाजिक कार्य करावे. मुला-मुलींच्या उच्च शिक्षणावर भर द्यावा, तरुणाईला व्यसनांपासून रोखण्यासाठी जनजाग्रुती करण्यात यावी. समाजातील शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना करा, असे मत दिलीपसिंग पाटील, सूरजसिंग राजपूत, काशिनाथसिंग ठाकूर, तुकारामसिंग पाटील, श्यामसिंग राणा यांनी व्यक्त केले.
*इतरांनाही समजून घ्या*
राजपूत समाजातील इतर पोटजातींमधील समाजबांधवांना देखील समजून घ्या. केवळ शेती, नोकरीवरच अवलंबून न राहता इतर उद्योग, व्यवसाय सुद्धा करा.शिक्षण घेणाऱ्या मुला, मुलींकरिता वसतीग्रुहाची सोय करण्यात यावी, असे मत स्वामी रवींद्रसिंग महाराज यांनी व्यक्त केले.
*मदतीचे आश्वासन*
राजपूत समाजासोबत काम करणाऱ्या इतर समाजबांधवांना देखील संघटनेत सामावून घेण्यात यावे. गरजूंना योग्य ती मदत देण्याचे अाश्वासन प्रवीणसिंग पाटील यांनी दिले. तसेच त्यांनी वु्द्धाश्रम उभारण्यासाठी प्रयत्नशिल असल्याची ग्वाही देखील दिली. तरुणांनी स्पर्धा परीक्षांकडे लक्ष देवून यशस्वी व्हावे. आपल्यातील आक्रमकता चांगल्या कामासाठी वापरा. मुलगा-मुलगी असा भेदभाव न करता दोघांना समान संधी उपलब्ध करुन द्या. नोकरी करणारे नव्हे, तर नोकरी देणारे व्हा, असे मत गणेशसिंह राजपूत, सुरेशसिंग राजपूत यांनी व्यक्त केले. जळगावात राष्ट्रीय मेळावा होणे अपेक्षित आहे. समाजकार्य करताना समर्पणाची भावना ठेवण्याचे आवाहन वीरेंद्रसिंग चव्हाण यांनी केले.
*कोरोना यौद्ध्यांचा गौरव*
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णसेवा, जनजाग्रुती, इतर समाजसेवा करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविक विलाससिंग पाटील, सूत्रसंचालन वैशाली पाटील यांनी केले.
या मेळाव्याप्रसंगी जळगाव शहराध्यक्ष अतुलसिंग पाटील, संजयसिंग राजपूत, संजीवनी इंगळे यांच्यासह धुळे, नंदुरबार, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील आणि मध्य प्रदेशातील पदाधिकारी देखील आदी उपस्थित होते.