कुऱ्हाड गावात भोंदूबाबा दररोज करतोय पन्नास हजाराची कमाई. मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण ?

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०७/२०२१
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथे एका इसमाचे घरी बाहेरगावाहून एक व्यक्ती आलेली असुन ती व्यक्ती स्वयंघोषित बाबा असल्याचे सांगून कुऱ्हाड गावात मंत्र तंत्राच्या साह्याने भुतबाधा, करणी, कवटाळ, अनेक व्याधींवर उपचार करतो तसेच दारुड्यांची दारु सोडवण्यासाठी पाच ते आठ हजार रुपये फी घेऊन लोकांची फसवणूक करत असल्याचे पंचक्रोशीतील जनतेतून चर्चिले जात आहे.
एका बाजूला आपण एकविसाव्या शतकात वावरत असतांनाच दुसरीकडे मात्र अजूनही अंधश्रद्धा वाढीस लावणारे दलाल आपणास पहावयास मिळत आहेत. या भोंदूबाबा विषयी थोडक्यात माहिती मिळाली असून याठिकाणी काही महिलांना वेगळाच अनुभव आल्याचीही चर्चा होत आहे. तरी या भोंदूबाबाची चौकशी होऊन अंधश्रद्धा वाढीस लावणाऱ्या भोंदूबाबाची जेलमध्ये रवानगी व्हावी असे मत सुज्ञनागरीकांनी व्यक्त केले आहे.
(याप्रकरणी भांडाफोड लवकरच)