पाचोरा पहुर पाचोरा एसटी बस त्वरित सुरू करण्याची मागणी

दिलीप जैन(पाचोरा)
दिनांक~२०/०६/२०२१
पाचोरा आगारातुन सायंकाळी सात वाजता सुटणारी एसटी बस लॉकडाऊच्या कालावधीत बससेवा बंद असल्यामुळे बंद करण्यात आली होती. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे एसटी बससेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे.
परंतु पाचोरा आगारातून सायंकाळी सात वाजता पाचोरा ते पहूर मुक्कामी जाणारी एसटी बससेवा अद्यापही सुरु केली नसल्यामुळे सायंकाळी पाचोरा तालुक्यातील औरंगाबाद जिल्ह्यात जाणाऱ्या अनेक प्रवाशांची तसेच सकाळी औरंगाबाद जिल्ह्यातून पाचोरा येथे येणाऱ्या प्रवाशांची तारांबळ होत असल्याने पहुर मुक्कामी बस पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
तरी पाचोरा आगार व्यवस्थापकांनी त्वरित पाचोरा पहूर मुक्कामी एसटी बससेवा सुरु करावी म्हणजे गरजू प्रवाशांना नहाकच मालवाहू ट्रक किंवा इतर खाजगी घाड्यातून जीवघेणा प्रवास करण्याची वेळ येणार नाही.