डोंगरगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड, वन विभागाची अर्थपूर्ण डोळेझाक.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०२/२०२२
पाचोरा तालुक्यात डोंगरगाव परिसरासह पिंपळगाव हरेश्वर, शिंदाड, डोंगरी सातगाव, वरसाडे तांडा, अंबे वडगाव, वरखेडी, कळमसरा, लोहारा, कुऱ्हाड, गिरड, नांद्रा, सामनेर या गावांसह इतर गावातील शेती शिवारात तसेच काही ठिकाणी नद्या, नाले, धरण, गुचरण भागात, राखीव जंगलात वीरप्पनची पिल्लावळ सक्रीय झाली असून मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या डेरेदार वृक्षाची कत्तल सुरु आहे. या वृक्षतोडीबाबत वन विभागाकडे वारंवार तक्रारी करुनही कारवाई तर होतच नाही तसेच संबंधित अधिकारी फोन सुध्दा स्विकारत नाहीत. परंतु उलट मोठ्याप्रमाणात वृक्षतोड सुरूच आहे यामुळे वनविभाग व लाकुड व्यापाऱ्यांचे अर्थपूर्ण संबंध असल्याचा आरोप निसर्गप्रेमी व सूज्ञ नागरिकांतून केला जात आहे.
(वृक्षतोड कडून दिवसाढवळ्या वाहतूक करणारे ट्रॅक्टर वन विभागाला दिसू नये हे नवलच)
दररोज दिवसाढवळ्या शेकडो हिरव्यागार डेरेदार वृक्षांची कत्तल होत असून या लाकडाची वाहतूक दिवसाढवळ्या केली जात आहे. तर काही भागात शेत शिवारात मोठ्या प्रमाणात लाकडाचा साठा करण्यात आला आहे. तरी या अवैध वृक्षतोडीकडे त्वरित लक्ष देऊन संबधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी असेल निसर्गप्रेमी कडून केलु जात आहे.
या सततच्या होणाऱ्या वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळत चालला असून वातावरणावरील ओझोन वायुचाइ स्तर झपाट्याने कमी होत आहे. तसेच निसर्गात झपाट्याने बदल झाला असून कधी उन्हाळ्यात पाऊस तर कधी पावसाळ्यात उन्हाळा तसेच बेमोसमी पाऊस होणे व इतर नैसर्गिक संकटे वाढत आहेत. म्हणून या वृक्षतोडीची उच्चस्तरीय चौकशी होऊन पाचोरा वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनीचे रेकॉर्ड काढून संबंधितांवर कडक कारवाई करावी तसेच काही ठिकाणी वन विभागाकडून हप्ते वसुलीसाठी काही ठिकाणी पंटर नेमण्यात आले असून या पंटरद्वारे लाकूड व्यापारी, लाकूड वखारीचे मालक, तसेच वीट भट्टीचे मालक यांचेकडून या पंटरच्या माध्यमातून हप्ते वसुली केली जात असल्याचे जनमानसातून चर्चिले जात असून याचीही चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.