मृत्यूच्या तांडवातही पत्रकार बेहाल.(पत्रकार महेंद्र खोंडे.)
दिलीप जैन.(पत्रकार)
दिनांक~०५/०५/२०२१
पत्रकार म्हटलं म्हणजे लोकशाहीचा चौथा खांब पत्रकार म्हणजे शासन, प्रशासन, जनता यांच्यातील महत्त्वाचा दुवा गल्लीबोळातील घटनांचे वृत्तांकन करून करुन क्षणार्धात दिल्ली दरबारात पोहचवणे तसेच केंद्रसरकार, राज्यसरकार यांच्या विविध योजना व घडामोडींचा वृत्तात जनतेसमोर मांडून जनतेता व सरकार यात संवाद साधून जनतेसाठी राबवण्यात येणाऱ्या योजना व जनतेतील अडीअडचणी शासनदरबारी मांडून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारा म्हणजे पत्रकार देव युगातही महर्षी नारदांनी त्रिलोकी भ्रमण करून संदेशवाहकाची भुमिका निभवली म्हणजे त्या काळात पत्रकारिता केली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
या युगातही पत्रकार तसाच प्रयत्न करत आहेत. या बाबतीत व्यथा मांडल्या आहेत. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील तऱ्हाडी येथील महाराष्ट्र राज्य नाभिक सेना महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख तसेच सकाळ वृत्तपत्राचे प्रतिनिधी महेंद्र खोंडे यांनी.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात बसला आहे. राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या वाढत असून बिकट परिस्थिती निर्माण होत आहे.कोरोना व्हायरसची दुसरी लाट गेल्या वर्षीच्या पहिल्या लाटेपेक्षाही मोठी असल्याचं गेल्या काही दिवसांत दिसून आलं. संपूर्ण देशाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कवेत घेतलं आहे. सध्या प्रतिदिन तीन लाखाहून अधिक चे नवे कोरोनाबाधित रुग्ण देशात आढळून येत आहेत. देशात एकाच दिवशी कोरोना ची लागण होण्याचा आणखीन एक उच्चांक नोंदवला गेला आहे. गेल्या ४८ तासात तीन लाख ८६ हजार ४५२ जणांना कोरोना ची लागण झाली आहे. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या १ कोटी ८७ लाख ६२ हजार ९७६ वर पोचली आहे. देशात कोरोना मुळे एकाच दिवसात ३४९८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात काल पर्यंत ६३२८२ रुग्णांची नवीन नोंद झाली आहे. त्यात ८०२ डेथ,६१३२६ रिकवर आहेत.
गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेचा फटका देशात महाराष्ट्राला सर्वाधिक बसला होता. यंदाही महाराष्ट्र कोरोनाची दुसरी लाट थोपवू शकला नाही. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून राज्यात प्रतिदिन सरासरी ६५ हजारांच्या आसपास नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होताना दिसते . कोरोनाच्या बातम्या देणाऱ्या पत्रकारांच्या जिवावरही तसेच बेतले आहे. महाराष्ट्राला पत्रकारांचा एक वेगळा वारसा लाभलेला आहे. आणीबाणीच्या काळात पत्रकारांनी घेतलेल्या भूमिका महत्त्वपूर्ण होत्या. या पत्रकारांचा वारसा वेगवेगळ्या माध्यमातून आजही जीवंत आहे.कोरोना काळात कोविड योद्ध्यांप्रमाणेच पत्रकारांचे कार्यही महत्त्वपूर्ण ठरत आहे. एकंदरीत नागरी व्यवस्था पणाबरोबर खांद्याला खांदा लावून पत्रकार बांधव कोरोना लढाईत उतरले आहेत. मात्र न्याय हकाच्या मागण्यासाठी आज ही पत्रकारांची मुस्कटदाबी होत असल्याचे चित्र आहे.
आणीबाणीच्या काळात ज्याप्रमाणे पत्रकारांची मुस्कटदाबी करण्यात आली, त्याप्रमाणे सध्या काही प्रमाणात तशीच परिस्थिती आहे . पत्रकार सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम करतात. घडलेल्या घडामोडी ची इत्यंभूत माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोचावण्याचे महत्त्वचे कार्य जिवाची पर्वा न करता पूर्णपणे हा पत्रकारच करत असतो. त्यामुळे पत्रकारांना ताकद देऊन त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, त्यासाठी राजकीय नेते व राज्यकतर्यांचे वरील सर्व बाबींकडे अक्षम्य किंवा राजकारण पूर्वक धोरण दुर्लक्ष करणे ही खरी चिंतेची बाब होऊन बसली आहे.
याच मृत्यूच्या तांडवात पत्रकारांचे जीव घेणं हाल होत असतांनाच राज्यात पत्रकारांना फ्रंट वर्कर जाहीर करावे म्हणून राज्यभर आत्मक्लेश आंदोलन करावे लागते. ही खेदाची बाब आहे. कारण राज्यात वार्तांकनाच्या निमित्ताने बाहेर पडल्याने तब्बल १२२ पत्रकार बांधवांना मृत्यूस सामोरे जावे लागले आहे. मात्र अजूनही माय बाप सरकार पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर समजायला तयार नाहीत.
मराठी पत्रकार परिषदेचे एस.एम.देशमुख. साहेब यांच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन उभी केली गेली. मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना ५ लाख मदत द्यावी. तसेच कोरोनाबाधीत पत्रकारांना उपचारासाठी राखीव बेड ठेवून वयोगटाचा विचार न करता सरसकट लसीकरण मोहीम तीव्र करावी. अशा मागण्यांसाठी आत्मक्लेश आंदोलने करावी लागत असतील तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभासाठी ही नक्कीच खेदजनक बाब आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
सरकारला यासंदर्भात कधी जाग येणार हाच प्रश्न सध्यातरी अनुत्तरिय आहे. कोरोना काळातही सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम करत असलेल्या पत्रकार बांधवांना दुर्लक्षित करत असल्याच्या भावना वाढीस लागत आहे. यावर सरकारने तात्काळ विचार करण्याची वेळ समीप येऊन ठेपली आहे. कारण कोरोना हे ही एक युद्धच आहे. सन २०१९ च्या डिसेंबर महिन्यात सुरू झालेले हे युद्ध केव्हा संपणार हे आजच्या परिस्थितीत तरी या भुतलावर कोणीही सांगू शकणार नाही. मात्र तरीही जीव धोक्यात घालून पत्रकार कर्तव्य पार पाडत आहेत. मात्र हे कर्तव्य पार पाडत असतांनाच त्याचे परिणाम त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना भोगावे लागत आहेत. तरीही पत्रकार आपल्या जीवाची पर्वा न करता या बिकट परिस्थीतीतही अहोरात्र वार्तांकन करुन जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
म्हणून सरकार आतातरी पत्रकारांना न्याय देईल का ? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.